पाेलीस पाटलांना मिळणार १५ हजार रुपये; आशा सेविकांच्या मानधनात ५ हजार रुपयांची वाढ

1 min read

मुंबई दि .१४:- राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनात आता वाढ करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मंत्रिमंडळाने अखेर मानधन वाढीचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत पोलीस पाटलांना ६ हजार ५०० रुपये मानधन देण्यात येत होते. आता त्यात वाढ करून हे मानधन १५ हजार रुपये दरमहा करण्यात आले आहे. तर तर राज्यातील आशा सेविकांना राज्य शासनाच्या निधीतून दिल्या जाणाऱ्या मानधनात ५ हजार रुपयांची वाढ करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली 200.21 कोटी इतकी अतिरिक्त खर्चास 961.08 कोटींच्या वार्षिक खर्चास मान्यता राज्य मंत्रिमंडळात दिली आहे.पोलिस पाटलांच्या मानधनात तब्बल ८ हजार ५०० ची वाढ झाली आहे.गोंदियातील महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाने यासाठी लढा सुरू केला होता. राज्यभरात सुरू असलेल्या या लढ्याची दखल घेत माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी यासंदर्भात सरकारशी चर्चा करणार असल्याची ग्वाही पोलीस पाटलांना दिली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. परिणय फुके यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पोलीस पाटलांचे मानधन ६ हजार ५०० रुपयांवरून १५ हजार रुपये करण्यास सहमती दर्शवली. त्यानुसार बुधवार, (ता. १३) मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस पाटलांच्या बैठकीत मानधनात ८ हजार ५०० रुपयांनी वाढ करण्यात आली. आता पोलीस पाटलांना १५ हजार रुपये मानधन मिळणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे