बिबट्याच्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या आयुषला वैद्यकीय उपचारासाठी १० लाख रुपये तात्काळ देण्याची सकल मराठा जुन्नर तालुक्याची मागणी

1 min read

जुन्नर दि.१४:- उंब्रज नंबर एक येथील आयुष शिंदे ह्या बालकावर बिबट्याने हल्ला केला. त्यामध्ये सुदैवानेते बाळ वाचले. त्याला वैद्यकीय उपचारासाठी आळेफाटा येथे खाजगी रुग्णालय मध्ये दाखल केले असून त्याच्या उपचारासाठी मोठा खर्च येणार आहे. जुन्नर तालुक्यातील उंब्रज नंबर एक येथील आयुष सचिन शिंदे या चार वर्षाच्या मुलावर बिबट्याने सोमवार दि. ११ रोजी सायंकाळी हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. त्याच्या उपचारासाठी कुटुंबियांना शासनाने दहा लाख रुपये निधी द्यावा. जुन्नर तालुक्यामध्ये आळे बाभूळ बन येतील काही महिन्यापूर्वी एका मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. त्या हल्ल्यामध्ये शिवांश भुजबळ हा मुलगा मृत्युमुखी पडला होता. त्यावर शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली दिसत नाही. तुटपुंजी मदत करून त्यांच्या कुटुंबाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शासनाने केलेले आहे. नागरिकांच्या भावना तीव्र असून बिबट्याचा बंदोबस्त करावा. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचे वारंवार हल्ले होत असतील आणि संबंधित कुटुंबांना न्याय मिळत नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. अन्यथा सकल मराठा समाज महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना , शेतकरी संघटना यांच्याकडून तीव्र स्वरूपांच्या आंदोलन करण्यात येणार आहे. याची वनविभागाने व तहसीलदार जुन्नर यांनी गंभीर दखल घ्यावी. असा इशारा योगेश तोडकर पुणे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना प्रमोद खांडगे पुणे जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय शेतकरी संघटना. अनिल गावडे मराठा समाज पुणे जिल्हा समन्वय सचिन थोरवे तालुकाध्यक्ष जुन्नर शेतकरी संघटना यांनी दिला. जयेश खांडगे शेतकरी संघटनेचे प्रवीण डोंगरे मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष साईनाथ ढमढेरे शिवनेरी शेतकरी संघटना अध्यक्ष राजेंद्र ढोमसे मनसेचे सुशांत दिवटे अनिल देशपांडे उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे