पुणे जिल्ह्यातील या तालुक्याचे नाव ‘राजगड’; राज्य सरकारचा निर्णय
1 min readपुणे दि.१४:- हिंदवी स्वराज्याची प्रथम राजधानी किल्ले राजगड, गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणजे किल्ले राजगड, छत्रपती शिवरायांनी २६ वर्ष आपल्या स्वराज्याचा कारभार ज्या ठिकाणावरून चालविला तो किल्ले राजगड, आता तालुका म्हणून ओळखला जाणार आहे. या गडकोटाला गतवैभव प्राप्त होण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत असताना राज्य मंत्रिमंडळामध्ये झालेल्या निर्णयानुसार वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका म्हणून करण्यात आले. शासनाच्या या निर्णयाचे तालुक्यांमध्ये सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.छत्रपती शिवरायांच्या सर्व सुखदुःखाचा साक्षीदार असलेला हा किल्ले राजगड अनेक वर्षे विकासापासून वंचितच राहिला. आज देखील तो डागडुजीच्या प्रतीक्षेत आहे. हे जरी खरे असले तरी. कालपासून पासून वेल्हे तालुक्याची ओळख ही तालुका राजगड म्हणून होणार असल्याने शासनाच्या या निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत केले जात आहे.