उंब्रज येथे एक बिबट्या जेरबंद करण्यात यश; परिसरात १० पिंजरे, १० ट्रॅप कॅमेरे, २५ जणांचा फौजफाटा तैनात

1 min read

उंब्रज दि.१५:- उंब्रज क्रमांक १ (ता. जुन्नर) येथे पाच दिवसांपूर्वी आयुष सचिन शिंदे या साडेतीन वर्षाच्या बालकावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात तब्बल १० पिंजरे, १० ट्रॅप कॅमेरे, २५ जणांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.आज शुक्रवार दि.१५ पहाटे ४ वाजता या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

पुढील कार्यवाही साठी सदर बिबट्याची रवानगी माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात करण्यात आल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली.

वनविभागाने आयुष शिंदे याच्या घर परिसरामध्ये दहा पिंजरे लावले असून या पिंजऱ्यामध्ये बिबट्याला भक्ष्य म्हणून काही पिंजऱ्यात कोंबड्या तर काही पिंजऱ्यामध्ये बकऱ्या ठेवल्या आहेत.

वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक उपवनसंरक्षक अमित भिसे व या विभागाचे वनसंरक्षक अधिकारी वैभव काकडे स्वतः या घटनाक्रमाकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. वन कर्मचाऱ्यांच्या दिवसा व रात्री वेगवेगळ्या टीम तयार करून परिसरामध्ये गस्त घातली जात आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे