जुन्नर वन विभागा ॲक्शन मोडवर; ओतूर परिक्षेत्रातील ८० हेक्टर वरील अतिक्रमण हटवले

1 min read

बेल्हे दि.७:- जुन्नर वनविभागाअंतर्गत ओतूर वनपरिक्षेत्रातील गुरुवार दि .७ रोजी जुन्नर तालुक्यातील खोडद फॉ. कं.नं. 45, मौजे नगदवाडी फॉ.कं.नं. 43, मौजे वडगाव कांदळी फॉ.कं.नं. 44, मौजे येडगाव फॉ. कं.नं. 43 तसेच मौजे हिवरे तर्फे नारायणगांव फॉ.कं. नं. 46 मधील वनहक्क दाव्याची नियमानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना नैसर्गिक न्यायाची पुरेशी संधी दिल्यानंतर अमोल सातपुते, (उप वनसंरक्षक जुन्नर),

यांचे मार्गदर्शनाखाली तसेच अमित भिसे, सहा. वनसंरक्षक, (अतिक्रमण व निर्मुलन), संदेश पाटील, सहा. वनसंरक्षक (वनीकरण) यांचे नेतृत्वाखाली जुन्नर वनविभागातील वैभव काकडे (वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर) तसेच स्मिता राजहंस, (वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर), प्रदीप राँधळ, वनपरिक्षेत्र अधिकारी खेड, महेश गारगोटे,

वनपरिक्षेत्र अधिकारी घोडेगाव, प्रदिप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी जुन्नर, संतोष कंक, वनपरिक्षेत्र अधिकारी चाकण तसेच वनविभागातील क्षेत्रीय कर्मचारी यांचेसह अतीक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाहीसाठी पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी पोलीस बंदोबस्त वनविभागास तात्काळ उपलब्ध करून दिला.

याकामी पोलीस विभागाकडील सुदर्शन पाटील, पोलीस उपअधीक्षक जुन्नर, फुगे, पोलीस निरीक्षक नारायणगांव, कांबळे, पोलीस उपनिरीक्षक आळेफाटा, गंधारे पोलीस उपनिरीक्षक जुन्नर तसेच गोविंद शिंदे, उपविभागीय अधिकारी जुन्नर आंबेगाव, रवींद्र सबनिस तहसीलदार जुन्नर, प्रमिला वाळूज,

गट विकास अधिकारी पंचायत समिती जुन्नर यांचेसह वनविभाग, पोलीस व महसूल विभागाकडील मिळून एकूण 200 जणांच्या सहाय्याने अतिक्रमण निष्कासन कार्यवाही पूर्ण करणेत आलेली आहे.

मौजे खोडद फॉ. कं.नं. 45, मौजे नगदवाडी फॉ. कं.नं. 43, मौजे वडगाव कांदळी फॉ.कं.नं. 44, मौजे येडगाव फॉ. कं.नं. 43 तसेच मौजे हिवरे तर्फे नारायणगांव फॉ. कं.नं. 46, येथील अतिक्रमण धारक यांच्या एकूण १३ झोपड्या, पाईपलाईन, शेती, केळीची बाग मिळून क्षेत्र १७ हे. तसेच मौजे थोरांदळे, ता. आंबेगाव, जि. पुणे येथील २२ झोपड्या क्षेत्र २२ हे. एकूण ३९ हे. क्षेत्र जेसीबी च्या सहाय्याने काढणेत आले.

सदर कार्यवाही मध्ये जेसीबी-40, ट्रॅक्टर- ६, टेम्पो-४, पोलिसांकडील ५ टनाच्या ४ गाड्या तसेच अॅम्बुलन्स व फायर ब्रिगेड यांचे उपस्थितीत शिस्तबद्ध अतिक्रमण निष्कासन केलेनंतर अतिक्रमण धारक यांना त्यांचे मूळ गावी जाणेसाठी विस्थापित करणेस सांगितले

व विस्थापित करीता वनविभागाकडून मदत करणेत आली. सदर ठिकाणी पुन्हा अतिक्रमण करू नये करीता वनविभागाकडून सलग समतल चर खोदणेची कार्यवाही करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे