जुन्नरच्या विकासासाठी १ कोटीं ९ लाख रुपयांचा निधी:- माजी आमदार शरद सोनवणे

1 min read

जुन्नर दि. १३:- जुन्नर शहरातील विविध – विकासकामांचे माजी आमदार शरद सोनवणे यांचा हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

यामध्ये जुन्नर नगरपरिषद हद्दितील विजय पवार घर ते बेळे आळी पुलापर्यंत सिमेंट काँकिटीकरण ४२ लाख, माई मोहल्ला येथील कब्रस्तानसाठी कंपाऊंड बांधणे १९ लाख ९१ हजार ७३८, जुन्नर शहरातील आगरपेठ पाणवठा येथील रस्ता सिमेंट काँक्रिटिकरण करणे २४ लाख २५ हजार ६०९,

आगरपेठ येथील हनुमान मंदिर सभामंडप व सुशोभिकरण करणे २२ लाख ८३ हजार ५९३ असे एकूण १ कोटी ९ लाख ९४० रुपये निधीतुने विकासकामे होणार आहेत.

याप्रसंगी शहर प्रमुख अविनाश कर्डिले, दीपेश परदेशी, गणेश पातुरकर, अलका फुलपगार, अकील शेख, पुष्कराज जंगम, सोनू पुराणिक, मनोज शिंदे, सिद्धार्थ लोणकर, अशोक घोटणे, राहुल घोटणे,

इमरान बेपारी, रिजवान पटेल, सचिन जाधव, आनंद कर्डिले, शशिकांत नेटके, मंगेश साळवे, शशिकांत वाडेकर, प्रवीण भालेराव, दीपक काटकर, मोहम्मद शरीफ इनामदार आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे