नीलेश लंकेच्या शरद पवार गटात प्रवेशाबाबत केवळ चर्चाच ……शरद पवार म्हणाले

1 min read

नगर दि.११:- पारनेर चे आमदार नीलेश लंके यांच्या प्रवेशाबाबत आज सकाळपासूनच चर्चांना उधान आले हाेते. मात्र, या चर्चांना काही अर्थ नाही, लंके पक्षप्रवेश करणार ही चर्चा मी तुमच्याकडून ऐकत आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी माध्यमांसमाेर बाेलताना दिली.

दरम्यान, लोकनेते लवकर निर्णय घ्या, दक्षिण नगरमध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ‘तुतारी’ वाजवा, असं म्हणत शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी नीलेश लंके यांनी शरद पवार गटात परत यावं, असं आवाहन केलं होतं.

कोल्हेंच्या त्या आवाहनाला नीलेश लंके यांनी प्रतिसाद दिला हाेता. मात्र, आमदार नीलेश लंके यांच्या घरवापसीची केवळच चर्चाच आहे. या चर्चेत काहीही तथ्य नसल्याचे स्वत: शरद पवार यांनी पुण्यातील पत्रकारांना सांगितले. तिकडे गेलेले बरेच जण परत येण्यास इच्छूक आहेत. मात्र, माहिती घेऊन त्यांच्याबद्दलचा निर्णय होईल, असेही शरद पवार म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे