शिवाई फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे येथे मोफत आरोग्य शिबिर

1 min read

बेल्हे दि.१२:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं-१ शाळेत शिवाई फाउंडेशन च्या वतीने मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका मिरा बेलकर यांनी दिली. शाळेचे माजी विद्यार्थी असलेले डॉ.अरुण औटी यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या साठी मुंबई येथून सर्व डॉक्टरांची टीम उपस्थित झाली होती. याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची व पालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तगट, गुडघेदुखी, डोळे तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी करत मोफत औषधोपचारही करण्यात आला.उपास्थित पालकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना पिझ्झा, बर्गर यापेक्षा हिरव्या पालेभाज्या दररोज आहारात देणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुप्रिया बांगर, उपाध्यक्ष सोहेल बेपारी, सदस्य विलास पिंगट, दादाभाऊ मुलमुले, संतोष पाबळे, शेखर पिंगट, मनीषा बांगर, शितल गुंजाळ, पालक प्रीतम मुंजाळ, सागर घोडे, बाबाजी खोमणे, स्वप्नील भंडारी इ. उपस्थित होते.

आरोग्य शिबिरासाठी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य वैशाली मटाले, सामाजिक कार्यकर्ते बबन औटी तसेच शाळेतील सर्व शिक्षकांचे यासाठी सहकार्य लाभले. उपशिक्षक हरिदास घोडे यांनी उपस्थित सर्व डॉक्टर व पालकांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे