जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पालक मेळाव्या संपन्न
1 min read
बेल्हे दि.११:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं-१ शाळेत पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका मिरा बेलकर यांनी दिली.अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुप्रिया बांगर होत्या. विद्यार्थांच्या गुणवत्ता वाढीसाठी आयोजित करावयाच्या विविध उपक्रमांची चर्चा प्रामुख्याने यामध्ये करण्यात आली. नवीन शैक्षणिक वर्षांत इयत्ता पहिलीसाठी नवीन प्रवेशाची माहिती पालकांना यावेळी उपशिक्षक संतोष डुकरे यांनी दिली.शिक्षणतज्ज्ञ विलास पिंगट यांनी मनोगत व्यक्त करत स्पोकन इंग्रजी चे क्लास सुरू करणेबाबत विषय मांडला. पालकांनी यासाठी सहमती दर्शविली.वार्षिक स्नेहसंमेलन, मिशन बर्थडे इ. उपक्रमांचा जमा खर्च यावेळी पालकांसमोर मांडण्यात आला.
वार्षिक स्नेहसंमेलन,मिशन बर्थडे इ उपक्रम यशस्वीपणे राबवून शाळेचा भौतिक विकास करण्यात महत्वाची कामगिरी केलबद्दल उपस्थित पालकांनी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य दादाभाऊ मुलमुले, संतोष पाबळे, शेखर पिंगट, वैशाली मटाले, मनीषा बांगर, शितल गुंजाळ, यांचा सन्मान केला.सर्व शिक्षकांनी पालक मेळाव्याचे नियोजन केले.
शालेय समिती उपाध्यक्ष सोहेल बेपारी यांनी शाळेला सहकार्य केलेबद्दल प्रीतम मुंजाळ, सागर घोडे, स्वप्नील भंडारी यांचा सन्मान केला.उपशिक्षक हरिदास घोडे यांनी उपस्थित पालकांचे आभार मानले.