मातोश्री शैक्षणिक संकुलात महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम
1 min read
कर्जुले हर्या दि.१० :- कर्जुले हर्या (ता.पारनेर) येथील मातोश्री शैक्षणिक संकुलात दि.९ मार्च रोजी जागतिक महिला दिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत मातोश्री आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल व रिसर्च सेंटर तर्फे मोफत स्त्रियांची आरोग्य तपासणी व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले.
मातोश्री ग्लोबल स्कूल तर्फे पालक सहवीचार सभेचे आयोजन करण्यात आले. त्यात महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्याकरता डॉ. मानसी अमेय कांबळे, अ.नगर व Social media व Stree Management विषयी राजश्री घोगरे , लोणी प्रवरा यांचे प्रमुख व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
त्यानंतर महिलांसाठी (पालक व महिला स्टाफ ) साठी पारंपारिक वेशभूषा , संगीत खुर्ची, फनिगेम्स, वक्तृत्व स्पर्धा या स्पर्धा आयोजित करण्यात आले.
वरील स्पर्धांसाठी अनेक मान्यवारांनी बक्षिसे दिली ते पुढीलप्रमाणे: १. रोकडेश्वर ज्वेलर्स, आळेफाटा व सचिन ज्वेलर्स आळेफाटा यांच्या तर्फे सोन्याची नथ २. सत्यम कलेक्शन आळेफाटा, आदिती क्रीएशन आणे, अपेक्षा क्रिएशन आळेफाटा, अशोकलाल ब्रदर्स टाकळी ढोकेश्वर यांनी प्रत्येकी एक पैठणी व हर्षल भंडारी महावीर टेक्सटाइल टाकळी यांचेकडून दोन पैठणी
३.भेटवस्तू – महावीर जनरल स्टोअर्स आळेफाटा, कोहिनूर मोबाईल शॉपी आळेफाटा या सर्वांची मातोश्री संकुला कडून आभार मानण्यात आले. तसेच राजश्री ट्रेडर्स आळेफाटा, अभिषेक / मयुरी फापाळे या मान्यवारांनी भरगोस बक्षिसे दिली.
सदर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या सर्व शाखानी राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज, मातोश्री मिरताई आहेर फार्मसी कॉलेज, मातोश्री ग्लोबल स्कूल, मातोश्री सायन्स कॉलेज, मातोश्री आयुर्वेद कॉलेज यांनी अतिशय सुंदर आयोजन केले.
सदर कार्यक्रमासाठी सर्व शाखानी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा मीरा आहेर, डॉ. श्वेतांबरी आहेर, शितल आहेर, यशवंत फापाळे, डॉ. कृपाल पवार, योगिता ठुबे (पोलीस अ.नगर), प्रतीक्षा निमसे, सुवर्णा उंडे, पाटील मॅडम, डॉ. रश्मी मॅडम, प्रो. जाधव मॅडम, डॉ. मदने मॅडम, अस्मिता मॅडम, निवडुंगे मॅडम, रोहोकले मॅडम, अनिता पारधी मॅडम यांनी अतिशय परिश्रम घेतले.