स्व. रसिक भाऊ धारीवाल स्मृती पुरस्कार 2024 व भव्य शालेय डान्स रेकॉर्ड डान्स स्पर्धेत ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कुल शिरूर चा प्रथम क्रमांक
1 min read
शिरूर दि.९:- शिरूर येथे महाशिवरात्री निमित्त आयोजित शालेय डान्स रेकॉर्ड स्पर्धेत ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कुल, तर्डोबाची वाडी, शिरूर या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला व त्याबरोबरच उत्कृष्ट दिग्दर्शन हा पुरस्कार देखील पटकावला.
या स्पर्धेमध्ये शिरूर ग्रामीण व शिरूर शहर मधील सतरा शाळांनी सहभाग घेतला होता. सर्व सहभागी शाळांचे सादरीकरण उत्कृष्ट दर्जाचे होते.
या स्पर्धेत ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कुलने स भारत : एक पावन भूमी या विषयावर सादरीकरण केले व आपल्या भारतातील विविध देवदेवतांचे दर्शन महानाट्यातून घडविले. शेवटी आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच भगवान शंकर यांचा अवतार हा सहसंबंध पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
भगवान कृष्ण,बाहुबली,भगवान श्रीराम, कांतारा ही या महानाट्यातील लक्षवेधी दृष्य ठरली. या महानाट्यात ५१ विद्यार्थी सहभागी होते.या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन व दिग्दर्शन प्राचार्या रुपाली जाधव, प्राचार्य गौरव खुटाळ, समन्वयक शोभा अनाप यांनी केले व या नृत्यासाठी सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कुलच्या या यशाबद्दल गंगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. राजेराम घावटे, सचिव सविता घावटे, संचालक दीपक घावटे, संचालिका अमृतेश्वरी घावटे, संचालक शिंदे, सेमी विभाग प्राचार्य संतोष येवले, प्राथमिक विभाग प्राचार्या सुनंदा लंघे, विभाग प्रमुख जयश्री खणसे यांनी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सहभागी विद्यार्थी व पालकांचे हार्दिक अभिनंदन केले.
हे नृत्यदिग्दर्शन करत असताना व इतर सर्व पूरक तयारी करताना ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कुल चे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी कठोर परिश्रम घेतले. संस्थेचे सीईओ डॉ. नितीन घावटे यांनी सर्वांचे आभार मानले व शुभेच्छा दिल्या.