समर्थ शैक्षणिक संकुलात विद्यापीठ स्तरीय पर्यटन शिबिर संपन्न
1 min read
बेल्हे दि.६:- राष्ट्रीय सेवा योजना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे,समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनियरिंग बेल्हे व जुन्नर पर्यटन विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “वैभवशाली जुन्नर चे पर्यटन ” या विषयावर दोन दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे करण्यात आले होते.या कार्यशाळेमध्ये पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामधील पुणे,नगर व नाशिक जिल्ह्यातील १०० स्वयंसेवकांनी आपला सहभाग नोंदवला.जुन्नर तालुक्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,युवकांनी आपापल्या परिसरातील ऐतिहासिक, सामाजिक व धार्मिकदृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या पर्यटन स्थळांचे जतन व संवर्धन करावे.
त्यायोगे व्यवसायाच्या संधी शोधाव्यात,निर्माण कराव्यात असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.प्रेरणादायी वक्ते डॉ.पंकज महाराज गावडे यांनी जुन्नर तालुक्याच्या विकासात पर्यटन क्षेत्राचे योगदान ऐतिहासिक, धार्मिक, आर्थिक व सामाजिक दृष्टिकोनातून महत्वाचे असून जुन्नर हे प्रत्येक गोष्टीमध्ये वैभवशाली असल्याचे सांगितले.
पर्यटन विभागाचे ऑपरेशनल एक्झिक्युटीव्ह अजय कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांशी चर्चात्मक संवाद साधत पर्यटन व्यावसायिक संधी व विविध योजना संदर्भात मार्गदर्शन केले. व्यवसाय म्हणून टूर्स अँड ट्रॅव्हल्स, कगाईड, साहसी पर्यटन,कृषी पर्यटन अशा अनेक गोष्टींचा विचार आपण करू शकतो असे यावेळी अजय कुलकर्णी म्हणाले.
महाविद्यालयीन पातळीवर युवकांच्या माध्यमातून पर्यटन स्थळांचे संवर्धन व पर्यटनाविषयी जाणीव जागृती निर्माण होणे गरजेचे आहे असे डॉ.श्रीकांत फुलसुंदर म्हणाले. डॉ.राधाकृष्ण गायकवाड यांनी जुन्नरचे ऐतिहासिक,सांस्कृतिक,धार्मिक दृष्ट्या असणारे जुन्नर पर्यटना चे महत्व विशद केले.यश मस्करे यांनी जैवविविधता खगोलीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले.
शिवनेरी ट्रॅक ची संस्थापक संतोष डुकरे यांनी विद्यार्थ्यांना शाश्वत व जबाबदार पर्यटन याविषयी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी राजुरी येथील पराशर कृषी पर्यटन केंद्राला भेट दिली.मनोज हाडवळे व नम्रता हाडवळे यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने आणि कुतूहलाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत पर्यटनातून नवनवीन रोजगाराच्या संधीची माहिती व मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेच्या प्रसंगी पर्यटन विभागाचे ऑपरेशनल एक्झिक्युटिव्ह अजय कुलकर्णी, जुन्नर तालुक्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस, डॉ.पंकज महाराज गावडे, संस्थेचे अध्यक्ष वसंतर शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके सर,राष्ट्रीय सेवा योजना पुणे जिल्हा समन्वयक प्रा.डॉ.श्रीकांत फुलसुंदर.
जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे संचालक यश मस्करे, पक्षीमित्र सुभाष कुचिक,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.धनंजय उपासनी, डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,रा से यो अधिकारी प्रा.भूषण दिघे,प्रा.अश्विनी खटिंग आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर यांनी प्रास्ताविक संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी तर आभार रासेयो अधिकारी प्रा.भूषण दिघे यांनी मानले.