प्राथमिक आरोग्य केंद्र आळे रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रलच्या वतीने पल्स पोलिओ कॅम्प

1 min read

आळेफाटा दि.४:- रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आळे (ता.जुन्नर) यांच्या सहकार्याने आळेफाटा स्टॅन्ड, हॉटेल हेमंत ढाबा, हॉटेल गुरुदेव हॉटेल, हॉटेल फाउंटन या चार ठिकाणी जागतिक पल्स पोलिओ दिनानिमित्त पाच वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला.

पोलिओ जगातून नष्ट व्हावा यासाठी जागतिक स्तरावर रोटरी प्रयत्नशील असून जगभरातून पोलिओचा समूळ नाश करण्यासाठी रोटरी प्रयत्नशील आहे.

याची बांधिलकी जपत रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल चे अध्यक्ष विजयकुमार आहेर, उपाध्यक्ष संभाजी हाडवळे सर, सचिव पराग गांधी रोटरियन हेमंत वाव्हळ यांनी विशेष प्रयत्न करून. 332 बालकांना पल्स पोलिओ देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आळे या ठिकाणच्या सुपरवायझर श्री मुंजाळ साहेब, सेविका व आळे येथील आशा वर्कर यांच्या सहकार्याने पल्स पोलिओ हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर रोटरीचे इतर सर्व सदस्य यांनी पल्स पोलिओ यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे