जिल्हा परिषद शाळा बागवाडी निमगाव सावा मध्ये ‘बागवाडी फेस्टिवल’ उत्साहात साजरा
1 min readनिमगाव सावा दि.३:- बागवाडी फेस्टिवल मध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन सांस्कृतिक कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडला. ग्रामस्थांच्या माध्यमातून सोपान शिवराम गाडगे/विजय थोरात फौजी बाबाजी गाडगे ग्रा सदस्य गणेश गाडगे, ज्ञानेश्वर गाडगे, किसन नाथा गाडगे, बाळू बबन गाडगे. जनार्दन मते, गणेश गाडगे, ग्रा सदस्य रामदास महादू गाडगे, बाळू बबन गाडगे, दीपक भिवसेन गाडगे यांच्या माध्यमातून अन्नदान लाभले.या वेळी महिलांसाठी खास लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता. त्यासाठी राम कृष्ण हरी वस्त्र भांडारकडून एक पैठणी, सुवर्ण कलेक्शनकडून एक पैठणी, भंडारी ज्वेलर्सकडून चांदीचा छल्ला, मोरया ऑटो गॅरेजकडून गिफ्ट, सुदर्शन जनरल स्टोअर्सकडून पाण्याचा जार. राधास्वामी मशनरीकडून इस्त्री, प्रेरणा केबल कडून बॅटरी देण्यात आली. विलास गांधी यांच्याकडून शाळेसाठी पाच फॅन देण्यात आले व ड्रीपरी सौजन्य विशाल सोनवणे इव्हेंट सौजन्य सुनील गहिणे यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक जाधव व औटी मॅडम यांनी केले. आभार माजी अध्यक्ष गणेश गाडगे (होमगार्ड ) यांनी केले व विशेष आकर्षण म्हणुन रिल स्टार नागेश्वरी केदार उपस्थित होत्या.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य यांचे नियोजनात सुंदर कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी पांडुरंग पवार (माजी उपाध्यक्ष जि प पुणे) तसेच निमगाव सावा ग्रामपंचायत आजी व माजी सदस्य गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच निमगाव सावा केंद्रातील सर्व शिक्षक स्टाफ, ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.