दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा
1 min read
निमगाव सावा दि.३:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आजीवन अध्ययन व ज्ञान विस्तार विभाग आणि श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निमगाव सावा (ता. जुन्नर) यांच्या संयुक्त विद्यमाने व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.प्रारंभी क्रांतीज्योती सावित्री माता फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. अर्थशास्त्र विभाग प्रमुख, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र संयोजक प्रा.अनिल पडवळ यांनी व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेच्या पहिल्या सत्रामध्ये व्यवसायातील संधी या विषयावर मार्गदर्शन केले.
प्रा.अनिल पडवळ यांनी विद्यार्थ्यांना व्यवसायाची संधी शोधून त्या व्यवसायात अपार मेहनत, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास याद्वारे मिळालेल्या संधीचं आपण सोनं करू शकतो असे सांगितले. व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी व्यवसायाचा प्लॅन, व्यवसायासाठी जागा, बाजारपेठ अभ्यास, बाजारपेठेतील स्पर्धा, ग्राहकांची पसंती, आवड,निवड, भांडवल, व्यवसायाची निवड, नोंदणी अनेक महत्त्वाच्या घटकांचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
एक छोटासा व्यवसायिक मोठा उद्योजक कसा बनू शकतो याबाबतची अनेक उदाहरणे देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये प्रा.नंदा आहेर यांनी व्यवसायातील करियर यावर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी व्यवसायाभिमुख बनून आपल्या व्यवसायात यशस्वी व्हावे. त्यातूनच अर्थार्जन, मान, सन्मान, प्रतिष्ठा मिळते. पण त्यासाठी कष्ट, जिद्द,चिकाटी आणि संयम ठेवून व्यवसाय करावा लागतो.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. छाया जाधव, आजीवन अध्ययन आणि ज्ञानविस्तार विभाग प्रमुख प्रियंका डुकरे, मराठी विभाग प्रमुख प्रल्हाद शिंदे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख सुभाष घोडे, वाणिज्य विभाग प्रमुख ज्योती गायकवाड, विज्ञान विभाग प्रमुख प्रवीण गोरडे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. मोनिका जाधव,विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. राहुल सरोदे.
प्रा. पूजा चिंचवडे, प्रा. पूनम कुंभार, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा.पूजा चिंचवडे यांनी केले तर प्रास्ताविक प्रा.प्रियंका डुकरे आणि प्रा.मोनिका जाधव यांनी आभार मानले.