जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं.१ शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
1 min read
बेल्हे दि.२:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं- शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमांचे प्रास्ताविक विलास पिंगट यांनी केले. अध्यक्षपद भूषवत बेल्हे गावच्या सरपंच मनीषा डावखर यांनी कार्यक्रमांचे उद्घाटन केले. राजेंद्र पिंगट, उपसरपंच, जानकू डावखर इ. मान्यवरांनी बालचमुंना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नवीन कार्यालयाचे उद्घाटन अंजना बाळासाहेब घोडके यांच्या शुभहस्ते कऱण्यात आले. या प्रसंगी विजय घोडके, ग्रामपंचायत सदस्य कमल घोडे, मंदाकिनी नाईकवाडी, पल्लवी भंडारी , नाजिम बेपारी, रियाज बेपारी, किरण गुंजाळ, अशोक घोडके इ मान्यवर उपस्थित होते.
शाळेतील सर्व विद्यार्थांनी यामध्ये सहभाग घेत विविध कलागुणांचा अविष्कार सादर केला. गणेश वंदना, देशभक्तीपर गीत, लावणी, गोंधळ, हिंदी गीत, कोळीगीत, रामायण अशा अनेक गीतांचे सादरीकरण यावेळी कऱण्यात आले. प्रेक्षकांनी संपूर्ण कार्यक्रमांचा आनंद घेत भरघोस बक्षिसे देत मुलांचे कौतुक केले.
शाळेतलील सर्व मुलांना कार्यक्रमात सहभाग घेता यावा. म्हणून कोरिओग्राफर व ड्रेपरी खर्चासाठी सहप्रायोजक म्हणून अनेक दानशूर देणगी दारांनी यासाठी सहकार्य केले. प्रेक्षकांसाठी लकी ड्रा चे आयोजन यावेळी कऱण्यात आले. कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, संतोष खैरे संचालक विघ्नहर साखर कारखाना, दिलीप गांजाळे, शिक्षक नेते खंडेराव ढोबळे व अनेक शिक्षकांनी उपस्थीत राहून विद्यार्थांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शाळेतील उपशिक्षिका कविता सहाणे, सुवर्णा गाढवे, प्रविणा नायकवडी, योगिता जाधव सुषमा गाडेकर, अंजना चोरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकांनी भरघोस अशी देणगी दिल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापिका मीरा बेलकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सुप्रिया बांगर, उपाध्यक्ष सोहेल बेपारी. सदस्य दादाभाऊ मुलमुले, संतोष पाबळे, शेखर पिंगट, ईश्वर पिंगट, मनीषा बांगर वैशाली मटाले, सुजाता पवार, शितल गुंजाळ , नितीन शिरतर, गायत्री भालेराव, विशाल चव्हान इ. सदस्यांनी ग्रामस्थ व पालक यांनी शाळेला 1 लाख 25 हजार रुपयांचे सहकार्य केलेबद्दल सर्व देणगी दारांचे आभार मानत देणगीदारांचा सन्मान केला. तुषार संभेराव यांनी उपस्थित सर्वांना अन्नदानासाठी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष डुकरे व आभार हरिदास घोडे यांनी मानले.