ओतूर गावात रंगला बाल आनंद मेळावा
1 min read
पिंपरी पेंढार दि.२:-ओतूर (ता. जुन्नर) येथे बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भाजी बाजाराचा विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला असल्याची माहिती पोलीस कर्मचारी देविदास खेडकर, दत्ता तळपाडे, शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र डुंबरे, शिक्षिका मंगल घोलप, पुष्पांजली असवले, शारदा भोर, संगीता ढाकणे. पल्लवी दिघे, अश्विनी आव्हाड, वैशाली मस्करे, सुजाता मंडलिक यांनी दिली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ यांनी या आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते. या निमित्ताने विद्यार्थ्यांचा व्यवहारिक दृष्टीकोण वाढविण्यासाठी भाजीपाला बाजार आयोजित करण्यात आला होता. विदयार्थ्यांनी विक्रीसाठी शेतामधील विविध प्रकारचा ताजा भाजीपाला व फळे विक्रीसाठी आणली होती.
या भाजी बाजारात ग्रामस्थ आणि महिलाही भगिनींनी भाजीपाला खरेदी करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला या भाजी बाजारात सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आकर्षक वेशभूषा आणि उत्कृष्ट विजेता यासाठी रोख स्वरूपाचा बक्षीसही ठेवण्यात आली होती.
कार्यक्रमाचे संयोजक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांनी केले येथील भरलेल्या बाजारात भाजीपाला खरेदी करताना परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती यावेळी उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांचे व्यवहारीक गुणांचे कौतुक केले आहे.