हातभट्टी दारु तयार करणाऱ्यांविरुद्ध जेजुरी पोलीसांची धडक कारवाई, सव्वापाच लाख रुपयांची दारू जप्त

1 min read

जेजुरी दि.५:- जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे हे पोलीस स्टेशनला हजर असताना सोमवार दि.४ रोजी यांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, ढोलेवाडी गावचे हद्दीत इसम नामे संतोष राठोड हा नाझरे धरणाच्या कडेला शेतात विहीरीजवळ आडोशाला गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याची भट्टी तयार करत आहे.

बातमीच्या अनुषंगाने पोलिसांनी दोन पंचांना बोलावुन घेवुन, पंचासह व पोलीस कर्मचारी यांच्यासह शासकीय वाहनाने जावुन छापा टाकला असता हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी भट्टी चालु असल्याचे दिसुन आले.

सदर ठिकाणी ०२ लोखंडी पातेले, त्यामध्ये गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे १०,००० लीटर कच्चे रसायन, ३५ लीटरचे निंळे रंगाचे प्लास्टीकचे ३५ कॅन्ड त्यामध्ये १,२२५ लीटर तयार गावठी हातभट्टी दारु, १० मन लाकडी सरपण,

काळा गुळ प्रत्येकी ०१ किलो वजनाचे सुमारे १२० ढेपा, एकुण १,२०० किलो, ०१ जर्मनचा चाटु त्यास नळी असलेला, ०१ जर्मनची थाळी असा माल व तयार दारु असा एकुण ५,२४,०००/- रु. किमतीचा माल मिळुन आला.

कच्चे रसायन व जळके रसायन, लाकडी सरपण साहीत्य असे जागीच नाश करण्यात आला आहे. गावठी हातभट्टी दारु मानवी आराग्यास अपायकारक आहे हे माहीती असुनही दारु तयार करणरा इसम संतोष राठोड हा पोलीसांची चाहुल लागताच पळुन गेला असून विविध कलमांनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील हे करीत आहेत. सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीण अधीक्षक पकंज देशमुख,बारामती अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव ,उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत पाडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे, पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील,पोलीस हवलदार अण्णासाहेब देशमुख,प्रविण शेडे, पोलीस मित्र खंडागळे यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे