शेअर मार्केट मधील पैशाच्या वादातून डांबुन ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडुन सुखरूप सुटका

1 min read

ओतूर दि.२९:- शेअर मार्केट च्या पैशाच्या वादातून डांबुन ठेवलेल्या चा प्रकार जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे उघडकीस आला असून सदर इसमाची ओतूर पोलीसांकडुन सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांना खात्रीलायक बातमी मिळाली की, इसम समीर गजानन निवतकर (मुळ रा. वेंगुर्ला जि. सिंधुदूर्ग सध्या रा. कोथरूड पुणे) यास ओझर येथील मोरया लॉजच्या रूम नं. १०४ मध्ये डांबुन ठेवुन सदरच्या रूमला बाहेरून कुलुप लावण्यात आले असल्याची खात्री लायक माहिती मिळाल्या नंतर त्यांनी पोलीस हवलदार नरेंद्र गोराणे, संदिप लांडे,संदिप भोते यांची टीम तयार करून सदरच्या टिमला मोरया लॉज ओझर या ठिकाणी योग्य त्या सुचना देवून पाठवले. मोरया लॉजमध्ये रूम नं. १०४ ला बाहेरून कुलुप लावण्यात आले होते व आतमध्ये इसम नामे समीर गजानण निवतकर यास कोंडलेले दिसुन आले. विश्वजीत महादेव ढोमसे (रा. ओझर ता. जुन्नर जि.पुणे) याने सदरच्या इसमास कोंडुन तो पुणे या ठिकाणी गेला असल्याचे पोलीस पथकास समजले. त्यानंतर पोलीसांनी मोरया लॉज रूम नं. १०४ मधुन समीर गजानण निवतकर याची सुखरूप सुटका केली.इसम नामे समीर गजानण निवतकर (वय-४० वर्षे मुळ रा. वेंगुर्ला जि. सिंधुदूर्ग) सध्या रा. कोथरूड पुणे यांनी आरोपी नामे विश्वजीत महादेव ढोमसे (रा. ओझर (ता.जुन्नर ) यांचे ११ लाख ५० हजार रू शेअर मार्केट मध्ये गुंतवुन. सदरचे अकाउंट समीर गजानण निवतकर हे स्वतः ऑपरेट करत होते. सदरच्या इसमाने आरोपीस सुरूवातीस १ लाख ८० हजार रू नफा कमावून दिला परंतू त्यानंतर त्यांना समीर गजानण निवतकर याच्यावर शंका आल्याने गुंतवणुक केलेले पैसे आताच्या आता मिळवुन दे असे म्हणुन दिनांक २७ फेब्रुवारी रोजी समीर गजानण निवतकर यास ओझर येथील मोरया लॉजमध्ये डांबुन ठेवले होते. पोलीसांनी समीर गजानण निवतकर यांची दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सुटका केल्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी विश्वजीत महादेव ढोमसे रा. ओझर (ता. जुन्नर) याच्या विरूध्द ओतूर पोलीस स्टेशनला दिनांक २८ फेब्रुवारी रोजी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस हवलदार आनंदा भवारी हे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर ओतूर पोलीसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे,पोलीस हवलदार नरेंद्र गोराणे,संदिप लांडे, संदिप भोते यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे