विज्ञान दिनानिमित्त विद्यानिकेतन मध्ये विद्यार्थांनी केले प्रयोगांचे सादरीकरण

1 min read

साकोरी दि.२९:- विद्यानिकेतन संकुलन साकोरी (ता.जुन्नर) येथे २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान विषयी आवड निर्माण व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, त्यांच्या बुद्धीस वाव, चालना मिळावी आणि विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने विद्यालयात विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. या मध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग सादर केले होते. हायड्रोपोनिक शेती, पवनचक्की, सौर ऊर्जा उपकरणे, रोबोट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, रिव्हर क्लीनिंग बोट, वॉटर फिल्ट्रेशन, स्मोक ॲब्सॉर्बर, फायर अलर्ट , मॅग्नेटिक ट्रेन, कुलर, वॉटर बोट, हायड्रोलिक ब्रिज, मायक्रोस्कोप, सोलर सिस्टम मायक्रोस्कोप इ.हे प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरी. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव सावा येथील विद्यार्थी व सर्वच शिक्षक वृंद उपस्थित राहिले होते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, संस्थेचे संस्थापक पांडुरंग साळवे यांची उपस्थिती लाभली. मुलांचे प्रयोग पाहून त्यांच्या शी प्रयोगविषयी चर्चा केल्या आणि विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. विज्ञान विषयाच्या शिक्षिका श्रद्धा वाघ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले तर विद्यानिकेतन संकुलनाचे प्राचार्य अमोल जाधव, पूर्व प्राथमिक विभागाच्या प्राचार्या रुपाली भालेराव – पवार, पी एम हायस्कुल च्या प्राचार्या सुनीता शेगर यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश शिंदे यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे