सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूल मध्ये मराठी राजभाषा दिन साजरा

1 min read

राजुरी दि.२८:- सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूल राजुरी (ता.जुन्नर) मध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने संस्थेचे चेअरमन व्ही.आर. दिवाकरण, संचालक सचिन चव्हाण, सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूलच्या संचालिका वर्षा भालेराव, प्रियंबदा सारंगी आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून मराठी राजभाषा दिनाचे महत्व सांगितले. संस्थेचे चेअरमन व्ही.आर. दिवाकरण यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व समजावून सांगितले तसेच मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. त्यात इयत्ता दुसरी ते आठवीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी बरेच प्रोजेक्ट बनवले. प्रिन्सिपल रिझवाना शेख, व्हाईस प्रिंसिपल सुरेखा बांगर, पर्यवेक्षक सलमा मॅडम आणि सर्व शिक्षक स्टाफ यांनी विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे