श्रीसंत निळोबाराय यात्रा व सप्ताहाची मिटींग प्रांताधिकारी यांचे उपस्थितीत संपन्न
पारनेर दि.२९: – राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या व “ब” वर्ग तिर्थक्षेत्र असलेल्या पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील श्रीसंत निळोबाराय देवस्थानच्या प्रसिध्दी प्रमुख पदावर दत्ता गाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देवस्थानची यात्रा व सप्ताहाच्या कार्यक्रमाची मिटींग देवस्थानचे कार्यालयामधे बुधवार दि.२८ रोजी पारनेर श्रीगोंदा विभागाचे प्रांताधिकारी गणेश राठोड यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. यावेळी पारनेरच्या तहसिलदार गायत्री सौंदाने,देवस्थानचे मुख्य विश्वस्त, अध्यक्ष मा.मंत्री अशोक सावंत, कार्याध्यक्ष व श्रीसंत निळोबारायांचे वंशज गोपाळकाका मकाशीर व संस्थानचे विश्वस्थांचे उपस्थितीमधे संपन्न झाली. यावेळी बोलताना देवस्थानचे अध्यक्ष अशोकराव सावंत यांनी सर्व विश्वस्तांचे उपस्थितीमधे दत्ता गाडगे यांच्या नावाची घोषणा केली. या नावाला सर्व विश्वस्त व ग्रामस्थांनी एकमुखी पाठींबा देत ठरावास मंजुरी दिली. दत्ता गाडगे हे मागील २१ वर्षापासुन प्रिन्ट व इलेक्ट्राॅनिक मिडीयामधे कार्यरत आहे.त्यांनी आजवर दैनिक पुढारी, दैनिक गांवकरी, दैनिक राष्ट्र सह्याद्री आदी प्रमुख दैनिकांमधे प्रतिनिधी ते तालुका प्रतिनिधी म्हणुन त्यांनी काम केले असुन, इलेक्ट्राॅनिक मिडीयामधील त्यांच्या कामाचा अनुभव दांडगा आहे. इलेक्ट्राॅनिक मिडीयामधे ते सध्या ते झी २४ तासचे प्रतिनिधी म्हणुन चांगले काम करत आहेत.तसेच त्यांनी राष्ट्र सह्याद्री न्युज चॅनलचे मुख्य समन्वयक,शिवसंवाद न्युज चॅनलचे मुख्य संपादक, मायभूमी न्युजचे संपादक,आपला आवाजचे विभागीय संपादक,एव्हिपी न्युजचे तालुका प्रतिनिधी,सीएनआय महाराष्ट्रचे ब्युरोचिफ म्हणुन चांगली कामगीरी बजावली आहे.त्यांनी इलेक्ट्राॅनिक मिडीया व प्रिन्ट मिडीयाचे माध्यमातुन मागील अनेक वर्ष श्रीसंत निळोबाराय देवस्थानची प्रसिध्दी केलेली आहे.त्याची पावती म्हणुनच त्यांची देवस्थानचे प्रसिध्दी प्रमुख म्हणुन नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा संस्थानचे मुख्य विश्वस्त व अध्यक्ष अशोकराव सावंत यांनी केली.देवस्थानच्या इलेक्ट्राॅनिक विभागाची सर्व जबाबदारी दत्ता गाडगे यांना दिलेली आहे. यापूर्वीसुध्दा मी निस्वार्थीपणे निळोबाराय देवस्थानच्या बातम्या दिलेल्या होत्या.यापुढील काळातही श्रीसंत निळोबाराय देवस्थानने दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पूर्ण करील.संत निळोबारायांच्या सेवेची संधी देवस्थानने मला उपलब्ध करुन दिली हे माझे परमभाग्य असल्याचे दत्ता गाडगे म्हणाले.याप्रसंगी श्रीनिळोबाराय संस्थानचे विश्वस्त प्रशांत गोसावी,गोविंद पिंपळनेरकर,मुकुंद पिंपळनेरकर, भाऊसाहेब लटांबळे,पांडूरंग रासकर,संपत रासकर. पांडूरंग सातपुते,पंढरीनाथ गुंजाळ,रामदास रासकर, सुरेश पठारे,संस्थानचे सचिव लक्ष्मण खामकर,सेवामंडळ सचिव चांगदेव शिर्के,पिंपळनेर ग्रामपंचायतचे सरपंच देवेंद्र लटांबळे,मा.सरपंच सुभाष गाजरे,मंडल अधिकारी बी.जी. पवार,सार्वजनिक बांधकाम उप विभागाचे पंकज लेंडे,सहाय्यक आगार व्यवस्थापक परीवहण विभाग पारनेर.ए.एम.कोतकर,वैद्यकीय अधिकारी डाॅ.एस जी बांगर, सहाय्यक अभियंता अनिल आवारी,तलाठी ए.के.लांडे, ग्रामसेवक एस बी नरोडे व गावातील प्रमुख संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.