जिल्हा वार्षिक योजना सन २३-२४ मध्ये नगोत्थान महाअभियान अंतर्गत जुन्नर नगरपरिषद हद्दीतील ६ विकास कामांना ५ कोटी ८८ लक्ष ४६ हजार रुपये मंजूर
1 min readजुन्नर दि.२८:- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आमदार अतुल बेनके यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजना सन २३-२४ मध्ये नगोत्थान महाअभियान अंतर्गत जुन्नर नगरपरिषद हद्दीतील ६ विकास कामांना ५ कोटी ८८ लक्ष ४६ हजार रुपये मंजूर १) जुन्नर नगरपरिषद हद्दीतील लोणार राळे गणपती मंडळ या ठिकाणी बहुउद्देशीय इमारत बांधणे – ९ लक्ष ६५ हजार २७९ रुपये.२) जुन्नर नगर परिषद हद्दीतील भास्कर गाठ येथे दशक्रिया होता तसेच पायऱ्यांचे सुशोभीकरण वॉचमन केबिन बांधणे व नव्याने स्नानगृह बांधणे – १ कोटी २८ लक्ष १७ हजार ७९९ रुपये. ३) जुन्नर नगरपरिषद मालकीचे कुंभार तलाव येथे संरक्षण भिंत व गार्डन सुधारणा करणे – १ कोटी ४९ लक्ष ९३ हजार २९० रुपये. ४) जुन्नर नगरपरिषद हद्दीतील शंकरपुरा पेठ येथील ज्योती वस्त्र भंडार ते काशी विश्वेश्वर मंदिरा पर्यंत रस्ता करणे – ४७ लक्ष ३९ हजार ३४९ रुपये. ५) जुन्नर नगरपरिषद हद्दीतील पोलसह सोलर हायमास्ट दिवे बसविणे – २ कोटी १० लक्ष ८० हजार १८१ रुपये. ६) जुन्नर नगरपरिषद हद्दीतील शिवसृष्टीच्या बाजूला बिरसा मुंडा स्मारक व सुशोभीकरण करणे – ४२ लक्ष ५० हजार १०० रुपये.