पुणे-नाशिक अंतर अवघ्या तीन तासांत पार होणार; चाकण, मंचर मार्गे थेट शिर्डीला जाता येणार

1 min read

पुणे दि.२९:- पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग हा सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग हा जलद आणि वेळेची बचत करणारा आहे. या महामार्गमुळे पुणे – नाशिक अंतर अवघ्या तीन तासात पार होणार आहे. या महामार्गावरुन राजगुरुनगर, चाकण, मंचर मार्गे थेट शिर्डीला जाता येणार आहे.नाशिक- पुणे रेल्वे मार्गाचे काम अधांतरी असताना पुणे ते नाशिक औद्योगिक महामार्ग लवकरच पूर्णत्वास येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ जून 2023 मध्ये पुणे ते नाशिक औद्योगिक द्रुतगती मार्गाचा प्रकल्प सादर केला. पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गाचा आराखडा तयार करण्यात आला असून सार्वजनिक बांधकाम विभागासमोर तो सादर करण्यात आला. राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गाच्या प्रकल्पास मान्यता दिली आहे.राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे राज्यभरात 4,217 किमी महामार्गाचे जाळे विकसित करण्यात येत आहे. या अंतर्गतच पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग बांधला जाणार आहे. हा महामार्ग 213 किलोमीटर लांबीचा असणार आहे. या महामार्गामुळे पुणे-नाशिक हा पाच तासांचा प्रवास तीन तासांत पूर्ण होणार आहे. या महामार्गासाठी 20,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पुण्यातील राजगुरुनगर, चाकण, मंचर मार्गे हा महामार्ग थेट नाशिकला जाणार आहे. या महामार्गामुळे पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. पुण्याच्या आयटी कंपन्या तसेच नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राला या महामार्गाचा मोठा फायदा होणार आहे. द्रुतगती महामार्गामुळे मुंबई-पुणे-नाशिक ही शहरे द्रुतगती महामार्गाने जोडली जाणार आहेत. यामुळे उद्योगांना याचा मोठा फायदा होणार आहे. पुणे-नाशिक प्रस्तावित महामार्ग राजगुरुनगर, चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर, सिन्नर मार्गे थेट शिर्डी तीर्थक्षेत्राकडे जाणार आहे. हा मगामार्ग तीन टप्प्यात जोडला जणार आहे. पहिल्या टप्प्यात पुणे ते शिर्डी असा 135 किमीचा मार्ग असणार आहे. दुसरा टप्पा शिर्डी इंटरचेंज ते नाशिक-निफाड इंटरचेंजपर्यंत 60 किमी पर्यंतचा असणार आहे. हा टप्पा सुरत-चेन्नई एक्सप्रेसवेला जोडला जणार आहे. महामार्गाचा तिसरा आणि शेवटचा टप्पा हा 60 किमीचा असणार आहे. नाशिक-निफाड इंटरचेंज ते नाशिक असा हा मार्ग असणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे