अवैद्य दारू धंद्यावर जुन्नर पोलिसांची कारवाई
1 min readजुन्नर दि.२६:- जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी जुन्नर पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्या पासून एका पेक्षा एक कारवाईचा बडगा सुरु केला आहे. जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीतील निरगुडे गावात एक इसम एका पत्र्याच्या शेड मध्ये अवैद्य रित्या दारू विक्री करत. असल्याची गोपिनीय बातमी पोलीस निरीक्षक किरण अवचर यांना मिळाल्या नंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शना खाली एक तपास पथक तयार करून सदर ठिकाणी छापा मारून आरोपी अशोक दुधाने (रा. निरगुडे ता.जुन्नर) याला मुद्देमालासह ताब्यात घेतले. असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामधे ७०० रुपये किमतीच्या देशी दारू संत्रा जी एम कंपनीच्या १० सील बंद बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिस शिपाई जालिंदर बंडगर यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस नाईक हिले हे करत आहेत.