पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवैध दारू विक्री फोफावली; ४९७ ढाबा, हॉटेलचालकांवर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
1 min read
पुणे दि.२८:- पुणे जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात बिअर शॉपी, वाइन शॉप यांसह परवानगी नसतानाही काही ढाबाचालक व हॉटेलचालक दारू पिण्याची परवानगी देताय तर ढाबा व हॉटेल चालकांनो खबरदार. असा प्रकार आढळून आल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे (एक्साइज) दारू पिणार्यांसह ढाबाचालकांवरही ५० हजारांपर्यंत दंड आणि ५ वर्षांची शिक्षा होऊ शकते.
या खात्याने ८ महिन्यांत विविध कारवायांमध्ये पुणे जिल्ह्यात ४९७ जणांवर अटकेची कारवाई केली आहे.पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हॉटेलिंग व मांसाहारी ढाब्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तळीरामांना ढाबा असो की हॉटेल या ठिकाणी मद्यपान केल्याशिवाय जेवण जात नाही. त्यात मांसाहार जेवण असेल तर मद्यपान करण्याचे ग्राहकांचे प्रमाण या ठिकाणी मोठे असते.
अधीक्षक चरणसिंग राजपूत आल्यापासून कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मग विनापरवानगी हॉटेल असो की, मांसाहारी ढाब्यामध्ये दारू पिण्यास बसलेल्या ग्राहकांना पाच हजारांपर्यंत दंड ठोठावण्यात येतो. अशा मद्यपान करणार्या व्यक्तीला किमान ५ हजार रुपये दंड करण्याची तरतूद आहे. उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम सुरू असून उत्पादन शुल्क खात्याचे सर्व अधिकारी सध्या अॅक्शन मोडवर आले आहेत.
यामध्ये बिअर शॉपी, वाइन शॉपी यांसह हॉटेल व ढाबामालकांकडून नियमांचे उल्लंघन केले जाते. त्यांच्याकडून ग्राहकांना दारू दिली जाते. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करून अशा हॉटेल / ढाबा चालक व अन्य ३८३ ठिकाणांवर आत्तापर्यंत कारवाई केली. तर ३१ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत ४९७ आरोपीवर कारवाई केली असून ७ वाहने जप्त केली आहे.
प्रतिक्रिया
“राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नेहमीच धाब्यावर पाहणी होते. एक्साइजच्या विविध पथकाकडून जिल्ह्यात ग्रामीण कारवाया होत आहेत, नियमांचे उल्लंघन करणार्या हॉटेल व ढाबाचालकांवर कारवाई सुरच राहणार आहे.”
चरणजितसिंग राजपूत,
अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे