फेक/बनावट/हॅक इंस्टाग्राम अकाउंट वरून होणा-या फसवणुकीबाबत सायबर पोलिसांकडून महत्वाची माहिती प्रसिद्ध
1 min read
पुणे दि.२५:- सध्या पुणे शहरातील नामवंत डॉक्टर, वकील, व्यावसायीक, शासकीय अधिकारी/कर्मचारी व इतर नामवंत व्यक्तींचे फेक इंस्टाग्राम अकाउंट बनवुन त्यांचे फ्रेंड लिस्ट मधील मित्र-मैत्रीण तसेच नातेवाईक यांना सदर फेक अकाउंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवुन त्यांचेकडून पैशाची मागणी करीत असलेबाबत सायबर पोलीस स्टेशन येथे तकारी प्राप्त होत आहे. असे आपणासोबत घडल्यास खालील प्रमाणे प्रक्रिया/प्रोसेस करून सायबर पोलीस स्टेशन तसेच National Cybercrime Reporting Portal (NCCRP) वे www.cybercrime.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन लवकरात लवकर आपली तक्रार नोंदवावी.
आपल्या स्व:ताचे नावाने बनवलेल्या फेक / बनावट खालेस रिपोर्ट कसे करावे?ज्यांचे फेक/बनावट इंस्टाग्राम खाते बनवले आहे त्यांनी आपल्या स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन बनवलेले फेक अकाउंट शोधा (सर्च करा), स्वतःला शोधता येत नसेल तर ज्यांना त्या प्रोफाईलवरुन रिक्वेस्ट आली आहे, त्यांच्याकडुन सदर फेक अकाऊंटची लिंक (युआरएल) मागवुन घ्या व खालील प्रमाणे प्रक्रिया / प्रोसेस करा.
फेक/बनावट अकाउंटवर गेल्यानंतर प्रोफाईलवरील उजव्या बाजुला तीन डॉटवर क्लिक करा. तुमच्या समोर आलेल्या ऑप्शन मधील “Report” या ऑप्शनवर क्लिक करून “Something About This Account” यावर क्लिक करा.त्यानंतर “They Are Pretending To Be Someone Else” हा पहिला ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
पुढे तुम्हाला ४ ऑप्शन दिसतील, Me / Someone I Follow/A Celebrity or Public Figure आणि Business or Organization. आपण आपलीच बनवलेली फेक प्रोफाईल/अकाउंट रिपोर्ट करत असल्याने त्यापैकी “Me” हा ऑप्शन सिलेक्ट करा, आणि “Next” या बटनावर करून “Block” वर क्लिक करा. फेक अकाउंट काही वेळाने बंद होईल.
इतरांनी सदरचे फेक / बनावट अकाउंट रिपोर्ट कसे करावी- फेक / बनावट अकाउंटवर गेल्यानंतर प्रोफाईलवरील उजव्या बाजुला तीन डॉटवर क्लिक करा. तुमच्या समोर आलेल्या ऑप्शन मधील “Report” या ऑप्शनवर क्लिक करून “Something About This Account” यावर क्लिक करा. त्यानंतर “They Are Pretending To Be Someone Else” हा पहिला ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
पुढे तुम्हाला ४ ऑप्शन दिसतील, Me / Someone I Follow / A Celebrity or Public Figure आणि Business or Organization. आपण इतरांची बनवलेली फेक प्रोफाईल/अकाउंट रिपोर्ट करत असल्याने त्यापैकी “Someone I Follow” हा ऑप्शन सिलेक्ट करा. आणि आपल्या समोरील “Search” या ऑप्शनवर क्लिक करून ज्यांच्या नावाने हे फेक / बनावट खाते बनवले आहे त्यांचे नाव सर्च करा व त्या नावावर क्लिक करून खालील “Submit Report” या बटनावर क्लिक करा.
आता पुढील स्क्रिनवरील “Next” बटनावर क्लिक करून “Block” वर क्लिक करा. फेक अकाउंट काही वेळाने बंद होईल. आपले इंस्टाग्राम खाते सुरक्षीत कसे करावे ?> १) प्रथम आपल्या खात्याचे Two-factor Authentication खाली दिलेल्या पद्धतीने चालू करावे. मोबाईल मधील इंस्टाग्राम अप्लीकेशन मध्ये आपले खाते चालू केल्यावर खालील उजव्या बाजूस असलेल्या आपल्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करावे.
त्यानंतर वरील उजव्या बाजूस तीन रेषा असलेल्या ऑप्शनवर क्लिक करावे. आता आपल्या समोरील पर्यायापैकी Settings and Privacy” वर क्लिक करावे.आता “Account Centre” “Password and Security” Two-factor Authentication वर क्लिक करून आपले इंस्ताग्राम खाते निवडावे. त्यानंतर आपल्या समोरील ०३ पर्ययापैकी “Text Message (SMS)” वर क्लिक करून “Next” बटनावर क्लिक करावे.
आपला मोबाईल क्रमांक नमूद करावा व “Next” बटनावर क्लिक करून आपल्या मोबाईल वर आलेला OTP नमूद करून “Next” बटनावर क्लिक करावे. आता “Done” या बटनावर क्लिक करावे.आता आपल्या खात्याचे Two-factor Authentication चालू झाले आहे. यामुळे आपले खाते हॅक होणेपासून वाचू शकेल तसेच ते सुरक्षीत देखिल होईल.(आपला Two-factor Authentication कोड (OTP) कोणालाही शेअर करू नये.)
आपले इंस्टाग्राम प्रायव्हेट (Private) कसे करावे ?मोबाईल मधील इंस्टाग्राम अॅप्लीकेशन मध्ये आपले खाते चालू केल्यावर खालील उजव्या बाजूस असलेल्या आपल्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करावे. त्यानंतर वरील उजव्या बाजूस तीन रेषा क्लिक करावे. असलेल्या ऑप्शनवर आता आपल्या समोरील पर्यायापैकी “Settings and Privacy” वर क्लिक करावे. आता “Account Privacy” वर क्लिक करून “Private Account” ऑप्शन समोरील टॉगलवर क्लिक करून ते ऑन करवा.
आता आपले इंस्टाग्राम खाते हे “Private” झाले आहे, यामुळे आपल्या खात्यावरील ययक्तिक फोटो/पोस्ट/व्हिडीओ हे आपल्याला add असलेल्या मित्र-मैत्रीण व नातेवाईक यांच्या व्यतिरिक्त कोणालाही दिसणार नाही. त्यामुळे आपल्या गोपनीय माहितीचा कोणी गैरवापर करू शकणार नाही.