मातोश्री कॉलेजच्या बारावी सायन्स च्या विद्यार्थांना निरोप

1 min read

कर्जुल हर्या दि.२५:-कर्जुल हर्या (ता.पारनेर) येथील बारावी सायन्स मधील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला.या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शितल आहेर (संचालिका, मातोश्री शैक्षणिक संकुल) या होत्या. तर प्रमुख उपस्थिती राणी लंके (जि. प. सदस्य,अहमदनगर), रावसाहेब रोहोकले (मा.चेअरमन, प्राथ. शिक्षक बँक अहमदनगर), बाळासाहेब उंडे (खजिनदार) यांची लाभली.

राहुल सासवडे (प्राचार्य, मातोश्री सायन्स कॉलेज) डॉ.कृपाल पवार (प्राचार्य, इंजिनिअरिंग कॉलेज), डॉ.राहुल रहाणे(उपप्राचार्य, फार्मसी कॉलेज), ज्ञानदेव सुंबरे,गणेश हांडे, राजेंद्र साठे, गणेश कुटे, अजिंक्य बिडकर, संजय यादव, कविता भालेराव. तसेच इतर सर्व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. मातोश्री सायन्स कॉलेज करीता विद्यार्थांनी कलर प्रिंटर, समई, फोटो फ्रेम, राउटर, पाणी जार, अभ्यासक्रमाचे चार्ट, डस्टबिन, माईक, घड्याळ अश्या अनेक वस्तू सप्रेम भेट दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे