भिमाशंकर करंडक समूहनृत्य स्पर्धेत समर्थ च्या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक
1 min readबेल्हे दि.२५:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (ता.जुन्नर) येथील सांस्कृतिक विभागाच्या वतीने समूह नृत्य स्पर्धेसाठी भिमाशंकर करंडक आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव २०२४ साठी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यातून तसेच परिसरातील बहुसंख्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला.
नृत्यातून मनोरंजनाचा अप्रतिम आणि सुंदर आविष्कार सादर करणाऱ्या समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथील विद्यार्थ्यांनी भिमाशंकर करंडक २०२४ च्या महाअंतिम सोहळ्यामध्ये समूहनृत्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावल्याची माहिती फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले यांनी दिली.समर्थ शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी आदिवासी बांधवांची जीवनशैली, संस्कृती, परंपरा या आदिवासी नृत्यातून भीमाशंकर करंडक येथे आपल्या नृत्याच्या कलाविष्कारातून सादर केली. कलेची उपासना आणि साधना करणारे आदिवासी लोक दिवसभर काबाडकष्ट करून रात्री विसाव्यासाठी सर्वांना एकत्र घेऊन आनंदाचे क्षण व्यतीत करण्यासाठी हे आदिवासी नृत्य सर्वांसमोर सादर करीत असतात.
विद्यार्थ्यांनी हातामध्ये ढोल घेऊन बांबूवर आपला तोल सावरत पर्यावरणाचा समतोल राखून त्याचे संवर्धन करावे असा सामाजिक संदेश या नृत्यातून देण्याचा प्रयत्न केला.उत्कृष्ट नेपथ्य,सुंदर वेशभूषा, उत्तम नृत्य दिग्दर्शन, पारंपरिक गीत हे या सादरीकरणाचे वैशिष्ट्य ठरले. हा नृत्य प्रकार सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी भरपूर मेहनत घेतली होती.
या समूह नृत्यातील उत्कृष्ट प्रदर्शनासाठी समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयातील नीरज शिगवण या विद्यार्थ्याला बेस्ट डान्सर म्हणून सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.समूह नृत्य स्पर्धेत निरज शिगवण, अंकिता दिवेकर, तन्मय घरत, प्रशिक जमदाडे, अजिंक्य वाघोले, नागेश रोहकले, वरद वनारसे, कौशल थोरात, यश दावणे. आदित्य गुजर, प्रसाद विश्वासराव, स्वरूप शेरकर, मयूर देशमुख, संदेश सांडे, सानिका गलांडे, अलिशा इनामदार, आरती मलकापुरे, अपूर्वा मुलीमनी, तन्वी पाटील, साक्षी पडवळ, आदिती निकम, सानिका फापाळे, ज्ञानेश्वरी सनस, सानिका पिंपळे,अक्षदा वाजे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांना सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील,अभिनेते उपेंद्र लिमये,जितेंद्र जोशी.
अभिनेत्री भाग्यश्री मोटे तसेच पूर्वा वळसे पाटील यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विभागाचे प्रा.दिपक साबळे,प्रा.निलम हाडवळे,प्रा.वैशाली भुतांबरे,प्रा.मिनाज ईनामदार,प्रा.रोहिणी रोटे,प्रा.रुपेश कांबळे यांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी भीमाशंकर करंडक मध्ये मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हतपक्की.
बीसीएस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.धनंजय उपासनी,क्रीडा संचालक एचपी नरसुडे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर,संकुलातील सर्व प्राचार्य,विभागप्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.