शिरोली बोरी हायस्कूलच्या दहावीच्या सदिच्छा समारंभाच्या कार्यक्रमात “एक विद्यार्थी एक झाड” उपक्रम साजरा

1 min read

शिरोली दि.२५:- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे न्यू इंग्लिश स्कूल इयत्ता दहावीच्या सदिच्छा कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शिरोली बोरी गावच्या सरपंच प्रिया खिलारी म्हणाल्या की सध्याचे युग खूप आव्हानात्मक असून शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना एमपीएससी यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी तयार केले पाहिजे. त्यासाठी दररोज त्यांना स्पर्धा परीक्षांचे विशेष मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. “एक विद्यार्थी एक झाड” या विशेष उपक्रमाचे व सहभागी विद्यार्थ्यांचे सरपंचांनी कौतुक केले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थी, शिक्षक, सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे आजी व माजी अध्यक्ष यांनी गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त व वृक्षमित्र योगेश शेळके सर यांच्या “एक विद्यार्थी एक झाड” या संकल्पने अंतर्गत 25 शोभेची झाडे भेट म्हणून दिली. आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार प्राप्त सातपुते गुरुजी म्हणाले की न्यू इंग्लिश स्कूल या शाळेचा सतत तीन वर्ष शंभर टक्के निकाल आहे. ही अभिमानाची बाब आहे. शाळेमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम चांगल्या प्रकारे राबविले जातात. गावातील माजी आदर्श शिक्षक शिवराम गुंजाळ यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इयत्ता आठवी व नववीच्या सर्व विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. सदरच्या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष खिलारी, तसेच माजी अध्यक्ष राजू पोळ, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका रत्नप्रभा वाघचौरे, एकनाथ तट्टू सर, अल्ताब मणियार, निशा खिलारी, वर्षा डावखर मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत गायकवाड यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश शेळके यांनी केले व उषा भारती यांनी आभार प्रदर्शन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे