शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये संगणक कार्यशाळेचे आयोजन

1 min read

ओतूर दि.२४:- ओतूर श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग डुंबरवाडी ओतुर या ठिकाणी शुक्रवार दि. २३ रोजी “ इंटरव्हू टेक्नीक अँड रिझुम राइटिंग” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रम उद्घाटनप्रसंगी अनुप केंभावी, दीपक चव्हाण (सॉफ्टस्किल ट्रेनर , पुणे) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी यु खरात संगणक विभागप्रमुख डॉ सुनील खताळ, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमुनिकेशन विभागप्रमुख प्राध्यापक नीता बाणखेले, महाविद्यालयीन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ मोनिका रोकडे, कार्यशाळा समन्वयक डॉ पूजा घोलप, प्राध्यापक काजल फापाळे. प्रथम वर्ष समन्वयक प्राध्यापक शिध्दार्थ पानसरे, प्राध्यापक राहुल सातपुते, प्राध्यापक ऋतुजा पोखरकर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाप्रसंगी केंभावी यांनी विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी जाताना कशाप्रकारे तयारी करावी स्वतःचा आत्मविश्वास कसा वाढवला गेला पाहिजे तसेच संभाषण कौशल्य कसे असावे.

मुलाखतीसाठी स्वतः ने एखाद्या विषयावर कसे सादरीकरण केले गेले पाहिजे त्याचप्रमाणे मुलाखतीसाठी उपस्थित होणारे प्रश्नोत्तरे तसेच रिझ्युम कसा तयार करावा मुलाखतीसाठी जाताना उमेदवाराचा पोशाख कसा असावा बोलण्याची पद्धत यावर अतिशय व्यवस्थितरित्या मार्गदर्शन केले.

तसेच सादरीकरणातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचा मेसेज वेगवेगळ्या रीतीने कसा पुढे जातो याचे मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना बायोडाटा, रिझ्युम, सी व्ही यामधील फरक समजावून सांगितला.विद्यार्थ्यांकडून प्रश्न समजावून घेऊन त्या प्रश्नांच्या उत्तराचे विश्लेषण व्यवस्थित रित्या त्यांना समजेल अशा पद्धतीने केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमर्षी महाले या विद्यार्थिनींनी तर शेवटी उपस्थितांचे आभार प्राध्यापक कविता सोमोशी यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे