दिलीप वळसे पाटील महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी दौंड येथील “मूल्यशिक्षण कार्यशाळेत” ठरला उत्कृष्ट स्वयंसेवक
1 min read
निमगाव सावा दि.२३:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय, केडगाव (ता. दौंड) या ठिकाणी जिल्हास्तरीय मूल्य शिक्षण कार्यशाळा दिनांक 21 व 22 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेमध्ये शारीरिक शिक्षण, बौद्धिक विकास, लैंगिक शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, करिअर मार्गदर्शन आदी अशा विविध विषयावरती मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी दिलीप वळसे पाटील महाविद्यालय निमगाव असावा येथील पवन पवार हा राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून गौरविण्यात आला. तसेच त्यासोबत रविंद्र हिवराळे हा विद्यार्थी या कार्यशाळेमध्ये सहभागी झाला होता. अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीन मोजाड यांनी दिली.
महाविद्यालयातील विद्यार्थी विविध कलागुण प्रदर्शनांमध्ये वेळोवेळी नेहमीच सहभाग घेत असतात आणि आपला एक वेगळा ठसा उमटवत असतात, असे मत व्यक्त करत प्राचार्य डॉ. छाया जाधव यांनी सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापक यांचे कौतुक केले.
तसेच संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, सचिव परेश घोडे, संचालक संदीप थोरात अध्यक्ष प्रतिनिधी कविता पवार तसेच सर्व प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.