१२ वी इंग्रजीच्या पेपरला १५ कॉपी बहाद्दरांवर कारवाई

1 min read

नगर दि.२२:-;उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा (१२ बोर्ड) पहिला पेपर बुधवार (दि.२१) रोजी होता. प्रशासनाकडून कॉपी मुक्त वातावरण ठेवण्यासाठी प्रयत्न झाले. त्यासाठी भरारी पथके नियुक्त करण्यात आली. त्यानुसार नगर जिल्ह्यात १५ कॉपी बहाद्दर विद्यार्थी आढळून आले आहेत. या विद्यार्थ्यांवर त्वरित कारवाई करण्यात आली.इयत्ता बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. या परीक्षेसाठी नगर जिल्ह्यात ११० परीक्षा केंद्रे होती. परीक्षेसाठी ६५ हजार १८ विद्यार्थी बसले होते. त्यातील ६४ हजार ९७ विद्यार्थी उपस्थित होते तर ९२१ विद्यार्थी अनुपस्थित होते. भरारी पथकाने कर्जत, जामखेड व पाथर्डी तालुक्यांत प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांना कॉपी केसमध्ये पकडले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे