वळसे पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी शिवनेरी मॅरेथॉन मध्ये प्रथम
1 min read
निमगाव सावा दि.२१:- किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर) येथे शिवजयंती निमित्त झालेल्या शिवनेरी मॅरेथॉन 2024 मध्ये 10 किलोमीटर गटात दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा तृतीय वर्ष वाणिज्य शाखेतील विद्यार्थी आशुतोष दगडू दळे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. शिवनेरी ट्रेकर्स असोसिएशन संस्थेमार्फत दरवर्षी शिवजयंती निमित्त शिवनेरी मॅरेथॉनचे आयोजन केले जाते.
चालू वर्षी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये नांदेड,जळगाव,नाशिक, मुंबई, पुणे, धुळे तसेच गुजरात मधील धावपटूंचा समावेश होता.आशितोष दळे यांनी दहा किलोमीटर अंतर 41 मिनिट 7 सेकंदात पार केले. त्याला रोख तीन हजार रुपये, पदक व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. क्रीडा शिक्षक प्रा.विजय काळे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.
महाविद्यालयाचे संस्थापक, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, सचिव परेश घोडे, सर्व संचालक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. छाया जाधव, सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले.