पोलीस निरीक्षक सतीश होडकर यांनी १२ वी च्या परीक्षार्थिंचे गुलाब पुष्प देऊन केले स्वागत

1 min read

आळेफाटा दि.२१:- आजपासून बारावीची बोर्ड परीक्षा सुरू झाली असून बुधवार दि.२१ फेब्रुवारी ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आळे (ता.जुन्नर) केंद्र क्रमांक ०१८४ बारावीचा इंग्रजी विषयाचा पहिला पेपर १०२७ विद्यार्थी देणार आहेत. प्रातिनिधीक स्वरूपात परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडकर यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. त्यांच्या समवेत ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे उपाध्यक्ष सौरभ डोके, सचिव अर्जुन पाडेकर, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य संपत गुंजाळ, संचालक बाबुराव कुऱ्हाडे, उल्हास सहाणे, देविदास पाडेकर, आळेगावच्या पोलीस पाटील म्हस्कुले, महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप भवारी. केंद्र संचालक भालेराव राजेंद्र, उपकेंद्र संचालक लांडगे मच्छिंद्र, खतोडे बाबासाहेब, कुऱ्हाडे सुरेश, गुंजाळ सचिन उपस्थित होते. महाविद्यालयाच्या वतीने सतीश होडगर यांचा सत्कार करण्यात आला. आणि सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे