विद्यानिकेतन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना
1 min read
साकोरी दि.२१:- विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी साकोरी शिवजयंती उत्सव २०२४ सालाबाद प्रमाणे याही वर्षी विद्यानिकेतन संकुलनात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छोट्या छोट्या बालचमुंसाठी पारंपारिक व ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांनी शिवछत्रपती महाराजांवर भाषणे, पोवाडे, नृत्य सादर केली. महाराजांना मानवंदना देण्यासाठी विद्यार्थ्यांनी लाठी काठी, तलवारबाजी असे मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके क्रीडा शिक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखवण्यात आली.कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन तसेच प्रतिमा पूजन विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमीचे प्राचार्य अमोल जाधव.
पूर्व प्राथमिक विभागाच्या प्राचार्या रूपाली भालेराव, तसेच पीएम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज च्या प्राचार्या सुनिता शेगर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता औटी यांनी तर अतुल बारवे यांनी आभारप्रदर्शन केले.