पुणे जिल्ह्यामध्ये एकाच वेळी ४३ ठिकाणी होणार स्वच्छता अभियान

1 min read

बोरी दि.२४ :- फेब्रुवारी प्रोजेक्ट अमृत अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ परियोजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) येथे रविवार दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात करण्यात आले आहे.संत निरंकारी मंडळाचे सचिव तथा समाज कल्याण विभागाचे प्रभारी जोगिन्दर सुखीजा यांनी या विषयी माहिती देताना सांगितले, की ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या आदर्श घोषवाक्यातून प्रेरणा घेत ही परियोजना अवघ्या भारतवर्षात जवळपास १५०० पेक्षा अधिक ठिकाणी, २७ राज्यें व केंद्र शासित प्रदेशांतील ९०० शहरांमध्ये एकाच वेळी राबविली जाणार आहे.

पुणे जिल्हाच्या विविध भागातून वाहणाऱ्या इंद्रायणी, मुळा, मुठा, भीमा, भामा, घोडनदी, पवना, वेळू, कुकडी, मीना, कऱ्हा, आनंदी अशा जवळ जवळ सर्वच नद्यांचे घाट तसेच शहरातील विविध तलाव अशा ४३ ठिकाणी एकाच वेळी विशाल स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

ज्यामध्ये ओंकारेश्वर नदी घाट ,कात्रज तलाव, आळंदी-देहू येथील इंद्रायणी नदी घाट, मोरया गोसावी येथील पवना नदी घाट इत्यादी ठिकाणे प्रमुख आहेत. अशी माहिती मिशनचे पुणे जिल्ह्याचे प्रभारी ताराचंद करमचंदानी यांनी दिली. या परियोजनेचा मुख्य उद्देश जलसाठ्यांचे संरक्षण, त्यांची स्वच्छता व जनसामान्यांमध्ये याविषयी ‘जागरूकता अभियान’ राबवून त्यांना प्रोत्साहित करणे हा आहे.संत निरंकारी मिशन सामाजिक व कल्याणकारी उपक्रमांमध्ये निरंतर आपली सक्रिय भूमिका बजावत वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान, तलासरी बांध परियोजना, वननेस वन, पर्यावरणीय मुद्यांबाबत जागरूकता यांसारख्या योजनांना कार्यान्वित करुन संचलित करत आहे.

नि:संदेह मिशनच्या अशा कल्याणकारी योजना पर्यावरण संरक्षण व धरतीला सुंदर बनविण्यासाठी एक प्रशंसनीय व स्तुत्य पाऊल आहे. ज्यावर अंमलबजावणी करुन धरतीला अधिक स्वच्छ, निर्मळ व सुंदर बनविले जाऊ शकते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे