पांडुरंग पवार यांच्या हस्ते गुंजाळवाडी ते तांबेवाडी रस्त्याचे भूमिपूजन संपन्न
1 min readबेल्हे दि.२५:- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गुंजाळवाडी (ता.जुन्नर) येथील कल्याण-विशाखापट्टण महामार्ग क्रमांक ६१ ते तांबेवाडी या रस्त्याचे डांबरीकरण करणे यासाठी आमदार अतुल बेनके यांच्या स्थानिक विकास निधीतून तीस लक्ष रुपये मंजूर झाला असून या रस्त्याचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुन्नर तालुका अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार व गुंजाळवाडीच्या सरपंच नयना रामदास गुंजाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी गुंजाळवाडीच्या सरपंच नयना गुंजाळ यांनी केलेल्या मागणीनुसार टप्प्याटप्प्याने निधी न देता महामार्ग क्रमांक ६१ ते तांबेवाडी या रस्त्याच्या कामाकरिता सलग निधी द्यावा अशी मागणी त्यांनी पांडुरंग पवार यांच्याकडे केली होती. सदर मागणीनुसार व पांडुरंग पवार यांच्या पाठपुराव्यातून आणि माध्यमातून या रस्त्यासाठी आमदार अतुल बेनके यांनी २५१५ च्या ग्रामीण विकास निधी अंतर्गत.
या रस्त्यासाठी ३० लक्ष रुपयांचा निधी व उर्वरित कामासाठी जिल्हा नियोजन मंडळ अंतर्गत ५० लक्ष रुपये निधी ३०५४ च्या माध्यमातून मंजूर केल्याची माहिती पवार यांनी दिली.
जिल्हा परिषदेचे सदस्य पांडुरंग पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष जुन्नर तालुका अतुल भांबेरे, गुंजाळवाडीच्या सरपंच नयना गुंजाळ, उपसरपंच राहुल बोरचटे, ग्रामपंचायत सदस्य गोविंद गुंजाळ, गोरख गुंजाळ, कविता बोरचटे, संतोष गुंजाळ, संगीता बोरचटे.
आशा गुंजाळ, दिपाली बोरचटे, सुनिता गुंजाळ, तंटामुक्ती अध्यक्ष बबन गुंजाळ, माजी सरपंच लहू गुंजाळ, माजी उपसरपंच किसन बोरचटे, संजय बोरचटे, रामदास गुंजाळ, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रामदास गुंजाळ, सिद्धेश बोरचटे, अरबाज मुजावर, गणपत बोरचटे, नथू गुंजाळ, आनंद गुंजाळ, दिनेश बोरचटे, भाऊसाहेब बोरचटे,भागचंद बोरचटे, दत्तात्रय गुंजाळ, भाऊसाहेब गुंजाळ.
हरिभाऊ गुंजाळ, देवराम गुंजाळ, गेनभाऊ गुंजाळ, सुभाष बोरचटे, पूजा बोरचटे, जालिंदर औटी, माऊली गुंजाळ, संदीप गुंजाळ, शामराव गुंजाळ, मयूर गुंजाळ, भास्कर गुंजाळ, व ग्रामविकास अधिकारी पुष्पा लोंढे, ठेकेदार संतोष औटी यांच्यासह इतरही ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष बबन गुंजाळ यांनी सदर रस्त्याच्या कामाकरता निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके व जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांचे आभार व्यक्त केले व भविष्यातही आपल्याकडून असेच सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.