महाळसाकांत खंडोबा महाराज यात्रा धामणीला लाखो भाविकांची उपस्थिती

1 min read

धामणी दि.२५:- आंबेगाव तालुक्याच्या पुर्व पट्ट्यातील जागृत देवस्थान कुलदैवत म्हाळसाकांत खंडोबा च्या यात्रेस लाखो भाविकांची उपस्थिती होती. मंदिर प्रांगणात मोठी दर्शनरांग होती तर समोरच्या मैदानात शेकडो दुकाने थाटली होती. बैलगाडा घाटात १७० नवसाचे बैलगाडे धावले.

यात्रेस सुरेखा निघोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख, स्वाभिमानी मराठा महासंघ जिल्हा कार्याध्यक्ष तसेच प्रा अनिल निघोट मा तालुका प्रमुख भारतीय विद्यार्थी सेना, खडकवाडी सोसायटी चेअरमन संतोष सुक्रे,मा चेअरमन नाथा सुक्रे अनेक बैलगाडा मालक उपस्थित होते.यात्रा कमिटी अध्यक्ष गजाराम जाधव, सरपंच रेश्माताई अजित बोर्हाडे, राजेंद्र घोलप,मा सरपंच सागर जाधव, घड्याळ कामकाज पहाणारे समीर तांबे, आकाश जाधव, शांताराम रोडे, बाबाजी बढेकर, बाळासाहेब विधाटे भगवे, संतोष पंचरास,विशाल बोर्हाडे, योगेश जाधव. मच्छिंद्र अमाप, गणेश भुमकर, कैलास भुमकर यांनी ऊत्तम व्यवस्था पाहिली.घाटात प्रसिद्ध अनाऊंसर सुनील मोरवे, बाळासाहेब शेळके, स्वप्निल सोनवणे यांनी आपल्या पहाडी आवाजात शर्यतीचे समालोचन करुन बैलगाडा रसिकांची मने जिंकली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे