गोहे बुद्रुक येथे सालसिद्धेश्वर महाराज यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न; २७० बैलगाडा शर्यती व कुस्त्यांचा जंगी आखाडा

1 min read

आंबेगाव दि.२४:- आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात आदिवासी पट्ट्यातील गोहे बुद्रुक येथील सालसिद्धेश्वर महाराज यात्रा सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी झाली. यात्रेत हरिनाम सप्ताहात बजरंग महाराज कर्जुले यांचे काल्याचे किर्तन आणि महाप्रसादानंतर २७० स्पर्धकांसह भव्य बैलगाडा शर्यती आणि कुस्त्यांचा आखाडा पार पडला.गावात व बाहेर रहाणारे सर्व ग्रामस्थ आबालवृद्ध बैलगाडाशौकीन यात्रेकरू, दुकान दार मोठ्या संख्येने या प्रसिद्ध यात्रेस उपस्थित होते.यात्रेस प्रा.सुरेखा निघोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख यांनी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या.प्रा.अनिल निघोट मा. तालुका प्रमुख भारतीय विद्यार्थी सेना. पंचायत समिती उपसभापती यात्रा कमिटी उपाध्यक्ष सुभाष तळपे, यात्रा कमिटी अध्यक्ष अशोक भवारी, विलास कदम, आनंद भालेराव, सरपंच महादेव भवारी, उपसरपंच कैलास गेंगजे, पोलिस पाटील चंद्रकांत भवारी, चेअरमन राजु गेंगजे यावेळी उपस्थित होते.बैलगाडा शर्यतीत विशाल साबळे व ओंकार पोटकूले डिंभे बुद्रुक यांचा बैलगाडा ९.९९ सेकंद सह घाटाचा राजा तर १०.११ सेकंद सह फायनल चा मानकरी ठरला, तर बबन गिरजु बांबळे फुवलडे १०.३५ सेकंद द्वितीय व लंकु कुंडलिक सैद गिरवली १०.७६ सेकंदसह त्रुतिय क्रमांक फायनलचे मानकरी ठरले.यात्रेची व्यवस्था यात्रा कमिटी तसेच अंकुश वालकोळी, प्रकाश मदगे, सुनिल गेंगजे, कृष्णा भवारी यांनी तर घड्याळ कामकाज कोंडीभाऊ वाळुंज, निशान विठ्ठल सुपे तर अनाऊंसर म्हणून नवनाथ वाळुंज, तेजेश बांगर, सौरभ पवार, प्रदिप भोर यांनी काम पाहिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे