ग्रामीण कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेचा एलआयसी हा कणा:-

1 min read

राजुरी दि.२४:- ग्रामीण कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेचा एलआयसी हा कणा आहे सुरक्षित करमुक्त गुंतवणूक म्हणजे एलआयसी असून त्याचा लाभ सर्वांनी घेणे आवश्यक आहे असे मत हभप डॉ.पंकज महाराज गावडे यांनी राजुरी (ता.जुन्नर) येथे भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या विमा सेवा व अधिकृत विमा हप्ता भरणा केंद्र शाखा उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.भारतीय आयुर्विमा महामंडळाचे वरिष्ठ विमा सल्लागार बाळासाहेब औटी , ऋषिकेश औटी यांच्या विमा सेवा व अधिकृत विमा हप्ता भरणा केंद्र राजुरी उद्घाटन डॉक्टर पंकज महाराज गावडे, मा वरिष्ठ मंडळ प्रबंधक एलआयसी पुणे विभागाचे दिलीप डुंबरे, एलआयसी चे नारायणगाव शाखा अधिकारी सुधीर कांत, विकास अधिकारी संजय खांदोडे. नारायणगाव उपशाखा अधिकारी आनंद ठाकूर, दिलीप कटके, समिती माजी सभापती दीपक आवटे, उपसरपंच ज्ञानेश्वर शेळके, वल्लभ शेळके सर, एमडी घंगाळे, ज्ञानेश्वर उंडे , आदी मान्यवर उपस्थित होते.एलआयसी बद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढलेले गौरव उद्गार व सरकारची असणारी हमी म्हणून विमा पॉलिसी घेताना एलआयसीचा स्वीकार करावा.दिलीप डुंबरे म्हणाले, की पेन्शन साठी योग्य आणि सुरक्षित पर्याय फक्त एलआयसीच्या योजना देतात, सुशिक्षित तरुणांना रोजगाराची संधी विमा व्यवसायातून विमा प्रतिनिधी म्हणून उपलब्ध आहेत. बदलत्या अर्थकारणात योग्य बदल एलआयसी करत असून नागरिकांनी एलआयसीच्या विविध विविध प्लॅनचा अभ्यास करून विमा संरक्षण घ्यावे असे आव्हान सुधीर कांत यांनी केले. प्रास्ताविकामध्ये वरिष्ठ विमा सल्लागार बाळासाहेब आवटे म्हणाले की जुन्नर तालुक्याच्या पूर्व पट्ट्यामध्ये राजुरी येथे एलआयसी चे अधिकृत विमा हप्ता भरणा केंद्र सुरू करण्यात आले असून या परिसरातील विमा ग्राहकांनी हप्ता भरणे त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. सूत्रसंचालन मोहन नायकवडी यांनी केले तर आभार आनंद ठाकूर यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे