85 वर्षाच्या खेळाडूने जिंकली सर्वांची मने
1 min readपणजी दि.१८:- नॅशनल मास्टर गेम गोवा येथील बेंबोलीयन स्टेडियम या ठिकाणी सुपर मास्टर गेम अँड स्पोर्ट फेडरेशन आयोजित मास्टर गेम मध्ये 85 वर्षाचा धावपटू सुरेश पटोले (रा.पुणे) यांनी सर्वांची मने जिंकली या 85 वर्षाच्या धावपटू 200 मीटर मध्ये भाग घेऊन सुवर्णपदक मिळवले अतिशय तरुणांनाही लाजवेल अशा प्रकारचे या ठिकाणी अथलेटिक गेम घेण्यात आले. गोवा या ठिकाणच्या स्टेडियम वरती केरळ या राज्यात न 1000 प्लेयर महाराष्ट्र मध्ये 700 प्लेयर गोवा राज्यात न 500 प्लेयर आसाम राज्यातून आठशे प्लेयर हरियाणा मधून चारशे प्लेयर पंजाब दिल्ली आणि इतर राज्यात न देखील भरपूर प्लेअर या ठिकाणी आले होते यामध्ये महिला प्लेअरचा देखील फार मोठ्या प्रमाणात सहभाग होता. अतिशय मनोरंज धाडसी खेळांमध्ये 35 वर्षांपुढील ते शंभर वर्षांपर्यंत अशा प्रकारे खेळाडूंनी भाग घेतला होता ह्या खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे आपला स्वतःचा फिटनेस तर राहतोच राहतो परंतु तो इतरांनाही देखील आदर्श ठरेल अशा प्रकारचे त्या ठिकाणी खेळ पार पडले त्यामध्ये शंभर मीटर 200 मीटर 400 मीटर पंधराशे मीटर तीन हजार मीटर पाच हजार मीटर आणि दहा हजार मीटर अशा प्रकारचे रनिंग मध्ये गेम होते. तसेच उंच उडी लांब उडी ट्रिपल जम्प पोलहाल्ट थाळीफेक गोळा फेक हॅमर थ्रो भालाफेक असे विविध प्रकारचे गेम या ठिकाणी खेळले गेले. या संपूर्ण खेळाडूंचं महाराष्ट्रातील बाळासाहेब जी चव्हाण व मुख्याध्यापक महेंद्र बाजारे यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्राच्या टीम मधुन आंबेगाव तालुक्यातील आंतरराष्ट्रीय प्लेयर हरिचंद्र थोरात यांनी दोन गोल्ड पथकाचे मानकरी झाले. तसेच बाजार यांनीदेखील 400 मीटर हार्डल्स 110 मीटर हर्डल्स या खेळामध्ये गोल्ड पदक मिळवले तसेच माननीय चेमटे सर यांनी देखील 200 मीटर रनिंग मध्ये गोल्ड पदक मिळवले तर आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रीय खेळाडू पोपट थोरात यांनी हायजंप मध्ये गोल्ड पदक मिळवले तसेच पालघरचे पीएसआय ज्ञानेश्वर आवटे यांनीदेखील पंधराशे मीटर मध्ये गोल्ड पदक मिळवले. तसेच हरियाणाचे धनीराम यादव यांनी देखील पंधराशे मीटर मध्ये गोल्ड पदक मिळवले सुहास साळुंखे, जितेंद्र साळुंखे यांनी देखील गोल्ड पदके मिळवली तसेच मुंबईमध्ये कुरुशीत मिस्त्री व अर्चना मॅडम पी टी टीचर मुंबई यांनी देखील गोल्ड पदके मिळवली या ठिकाणी ज्या खेळाडूंनी गोल्ड पदके मिळवली आहेत अशा सर्व खेळाडूंची जर्मनी या ठिकाणी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय गेम साठी निवड झालेली आहे. या गेम मध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे सर्व खेळाडूंनी भाग घेतला गोवा राज्याच्या गोवा राज्याच्या स्पोर्ट फेडरेशन सर्व खेळाडूंची अतिशय उत्कृष्ट व्यवस्था केली व सर्वांना प्रशस्तीपत्र व मिडल देऊन गौरवण्यात आले या स्पर्धा संपल्यानंतर शेवटी आसामच्या महिला खेळाडूंनी त्यांचं लोकगीत त्या ठिकाणी आनंदाच्या उसाच्या भरात सादर केले.