ओतूर येथील शरदचंद्र पवार इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यापीठ पातळीवरील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न

1 min read

ओतूर दि.१:- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग आयोजित डुंबरवाडी येथे शिक्षणमहर्षी श्री विलासराव तांबे विद्यापीठ पातळीवरील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा गुरुवार दि.२५ ते व शुक्रवार दि २६ रोजी आयोजीत करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी साखळी आणि सेमी फायनल सामने खेळवले गेले. त्यामध्ये १० महाविद्यालयांनी आपला स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यामधून पहिल्या दिवशी दोन संघ अंतिम फेरीत दाखल झाले त्यामध्ये जयहिंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कुरण आणि समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे या संघांचा समावेश होता. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी विजेत्या संघांमध्ये सामना खेळवण्यात आला त्यामधून समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे या संघाचा विजय झाला. कार्यक्रमाप्रसंगी बक्षीस वितरणासाठी ओतूर पोलीस स्टेशनचे सचिन कांडगे (एपीआय) तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी.यु खरात सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, विजयी संघ उपस्थित होते. बक्षीसं वितरणामध्ये विजेता व उपविजेता संघास रोख पारितोषिक ट्रॉफी व प्रत्येक खेळाडूला प्रमाणपत्र तसेच सन्मान चिन्हाने गौरवण्यात आले. अंतिम सामन्याच्या दरम्यान उत्कृष्ट गोलंदाज व उत्कृष्ट फलंदाज अनुकमे समीर पवार समर्थ इन्स्टिट्युट फार्मसी, बेल्हे, हर्ष नायडू जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कुरण, मॅन ऑफ दी मॅच व मॅन ऑफ दी सिरीज हे अभि गडगे समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे यांना देण्यात आले. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक नीता बानखेले यांनी केले.कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी संस्थेचे मानद सचिव वैभव तांबे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी खेळाडू भावनेने या स्पर्धेत सहभाग घ्यावा तसेच पुढील वर्षी अधिक व्यापक प्रमाणात ही स्पर्धा घेण्यात येईल अशी माहिती देऊन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या व स्पर्धेचे उद्‌घाटन केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी यु खरात, शरदचंद पवार मॅनेजमेंट कॉलेजचे प्राचार्य डॉ रमेशजी काकड, विलासराव तांबे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय देवकर, क्रीडा समन्वयक डॉ सुनील खताळ प्रा राजेंद्र डुंबरे सर्व विभागप्रमुख,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,सहभागी संघ, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या उपस्थितीने झाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे