ओतूर येथील व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचा ॲथलेटिक कप मध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक
1 min read
ओतूर दि.१६:- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्हिजन इंटरनॅशनल स्कूल, खामुंडी (ता.जुन्नर) या स्कूलचे विद्यार्थी स्मरण अभिजीत हांडे व अभय समयाल यांनी
एज्युकेशन अँड स्पोर्ट प्रमोशन फाउंडेशन (महाराष्ट्र) आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर ॲथलेटिक कप २०२३-२०२४ मध्ये राज्य स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला आणि त्यांची निवड राष्ट्रीय स्तरावर झालेली आहे.
या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये आठ वर्ष वयोगटातून स्मरण अभिजित हांडे व दहा वर्षे वयोगटातून अभय समयाल
यांनी राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांना स्कूलचे क्रीडा शिक्षक अनिल बोर्डे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
स्मरण अभिजीत हांडे व अभय समयाल यांनी एज्युकेशन अँड स्पोर्ट प्रमोशन फाउंडेशन (महाराष्ट्र) आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲथलेटिक कप २०२३-२०२४ मध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकविल्याबद्दल त्यांचे
संस्थेचे अध्यक्ष विशाल तांबे, मानद सचिव वैभव तांबे, खजिनदार मयूर ढमाले व्हिजन स्कूलच्या प्राचार्य प्रियांका जोंधळे तसेच इतर शिक्षक कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.