तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत बेल्हे नंबर -१ शाळेचे घवघवीत यश
1 min read
बेल्हे दि.२९:- यशवंतराव चव्हाण कला- क्रीडा महोत्सव २०२३-२४ अंतर्गत तालुकास्तरीय क्रिडास्पर्धा खानापूर या ठिकाणी पार पडल्या. नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यामध्ये दरवर्षी कला क्रिडा महोत्सव आयोजित करण्यात येतो. विद्यार्थ्यांच्या विवीध कलागुणांना वाव देण्यासाठी सांघिक व वैयक्तीक क्रिडा प्रकारांचे आयोजन यामध्ये केले जाते.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं १ शाळेने विविध सांघिक व वैयक्तीक स्पर्धांमध्ये भाग घेत घवघवीत यश संपादन केले.यामध्ये लहान गटात मुलींनी लेझिम मध्ये छान प्रात्यक्षिक सादर करत द्वितीय क्रमांक मिळविला. त्याचबरोबर वकृत्व स्पर्धेमध्ये कु.ध्येया विलास पिंगट या विद्यार्थिनीने ‘मी शेतकरी बोलतोय’ या विषयावर विचार मांडत तृतीय क्रमांक पटकावला.
यासाठी प्रवीना नायकोडी, कविता सहाणे, योगिता जाधव, सुवर्णा गाढवे, सुषमा गाडेकर अंजना चौरे इ.शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.लेझीम व वकृत्व स्पर्धेमध्ये यश मिळवल्या बद्दल गटशिक्षाधिकारी अनिता शिंदे , विस्तार अधिकारी विष्णु धोंडगे, केंद्रप्रमुख सोपान बेलकर, यांनी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सर्वांचे कौतुक केले.
सरपंच मनिषा डावखर, उपसरपंच राजेंद्र पिंगट व सर्व सदस्य,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सुप्रिया बांगर, उपाध्यक्ष सोहेल बेपारी, सदस्य दादाभाऊ मुलमुले, वैशाली मटाले, शेखर पिंगट, संतोष पाबळे, मनीषा बांगर, नितीन शिरतर विलास पिंगट तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मिरा बेलकर सर्व पालक व ग्रामस्थ यांनी मार्गदर्शक शिक्षक व सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिंनदन केले.अशी माहिती उपशिक्षक हरिदास घोडे व संतोष डुकरे यांनी दिली.