विभागीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा डॉ. कदम गुरुकुल इंदापूर संघाची बाजी
1 min read
इंदापूर दि.२०:- क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आलेल्या विभागीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा (मुली) 14 वर्ष वयोगट तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती या ठिकाणी दि.19 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या.
पुणे जिल्हा ग्रामीण चे नेतृत्व करीत असलेल्या डॉ. कदम गुरुकुल इंदापूर या संघाने सोलापूर ग्रामीण व पुणे शहर या संघांचा पराभव करून राज्यस्तरीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा जळगाव या ठिकाणी निवड झाली. विजयी खेळाडूंची नावे – आर्या विकास चव्हाण, प्रगती संदीप जगताप, स्वरा तुषार गुजर, अस्मि नितीन राऊत, प्राची सतीश कोरे, ऋतुजा सोनबा गिरी, तनया सचिन पवार,
आर्या सचिन बिचकुले, यज्ञा अभिजीत पाटील, आर्या अमित दुबे, तरुन्नम वसीम शेख, नंदिनी हरिश्चंद्र गोळे, तनिष्का प्रदीप आवटे पाटील, मेहेक विपुल लोढा, अनुष्का बापू शिंदे या खेळाडूंनी विजय खेचून आणला. संघाचे प्रशिक्षक सोमनाथ नलवडे, सचिन सूर्यवंशी यांचे डॉ. कदम गुरुकुलचे चेअरमन डॉ. एल. एस. कदम,
शैक्षणिक संचालिका डॉ. सविता कदम सचिव नंदकुमार यादव डॉ. कदम गुरुकुल च्या प्राचार्य वृंदा मुलतानी जोशी, उपप्राचार्य ऋषी बासू, अनिता पराडकर, स्कूल मॅनेजर संदीप जगताप सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विजयी खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.