व्हिजन स्कूलची झोबिया शेख ओपन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप २०२३ मध्ये द्वितीय
1 min readओतूर दि.१८ :- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्हिजन इंटरनॅशनल स्कूल खामुंडी (ता.जुन्नर) या स्कूलची विद्यार्थिनी झोबिया शेख हिने योगेश स्केटिंग अकॅडमी कराड येथे आयोजित केलेल्या ओपन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप २०२३ मध्ये द्वितीय क्रमांक पटकावीला. सर्वसाधारण या स्पर्धेमध्ये एकूण १००० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये दहा वर्ष वयोगटातून तिने द्वितीय क्रमांक पटकविला. झोबियाला स्कूलचे क्रीडाशिक्षक अनिल बोर्ड व ऋषिकेश वालझडे, दिपाली शहा या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. झोबिया शेख हिने स्केटिंग मध्ये द्वितीय पारितोषिक पटकवल्याबद्दल तिचे संस्थेचे अध्यक्ष विशाल तांबे, सचिव वैभव तांबे, खजिनदार मयूर ढमाले, व्हिजन स्कूलच्या प्राचार्या प्रियंका जोंधळे तसेच इतर शिक्षक कर्मचारी यांनी हिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.