डॉ. कदम गुरुकुल इंदापूरला राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेत दुहेरी विजेतेपद

1 min read

इंदापूर दि.१५:- क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धा 14 वर्ष वयोगट छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. पुणे विभागाचे नेतृत्व करीत असलेल्या डॉ. कदम गुरुकुल इंदापूर मुले व मुली या दोन्ही संघाने मुंबई व कोल्हापूर विभागाचा पराभव करून राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचे दुहेरी विजेतेपद मिळवले मुलांच्या गटातील प्रथम सामना पुणे विभाग विरुद्ध लातूर विभाग यांच्यामध्ये झाला सदर सामन्यात 5/1 ने पुणे विभागाने लातूर विभागाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत पुणे विभाग विरुद्ध नागपूर विभाग हा सामना झाला. यामध्ये पुणे विभागाने 11/0 ने नागपूर विभागाचा पराभव करून,अंतिम फेरीत प्रवेश केला. पुणे विभाग विरुद्ध कोल्हापूर विभाग यांच्यामध्ये नेत्रदीपक असा सामना होऊन यामध्ये 4/0 ने पुणे विभागाने विजय मिळवला.यातील विजयी खेळाडू – नवीश नंदकुमार यादव, शिवराज पांडुरंग शेरकर, तेज तानाजी कचरे, यश सुरेश शिंदे, वेदांत ज्ञानेश्वर देवकर, वेदांत लक्ष्मण सपकाळ, ओम बालाजी अडसुळे,यश सूर्यकांत साळुंखे, राजीव देवराज दुताळ,रोहन राहुल पारेकर, अक्षय दादासाहेब खाडे, प्रेम पियुष बोरा, आर्यन सचिन बदादे, साकीब मेहमूद सय्यद, संजीत अभिजीत यादव, धनराज सोमनाथ काळे. हे खेळाडू विजयाचे शिल्पकार ठरले.तर मुलींच्या गटातील प्रथम सामना पुणे विभाग विरुद्ध कोल्हापूर विभाग यांच्यामध्ये झाला. यामध्ये 5/0 ने पुणे विभागाने कोल्हापूर विभागाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत पुणे विभाग विरुद्ध लातूर विभाग हा सामना झाला यामध्ये 4/1ने पुणे विभागाने लातूर विभागाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामना पुणे विभाग विरुद्ध मुंबई विभाग यांच्यामध्ये खूप चुरशीचा होऊन.11/0 ने पुणे विभागाने विजय मिळवला. विजयी खेळाडूंची नावे -आर्या विकास चव्हाण,प्रगती संदीप जगताप, स्वरा तुषार गुजर, अस्मि नितीन राऊत, प्राची सतीश कोरे, ऋतुजा सोनबा गिरी, तनया सचिन पवार, आर्या सचिन बिचकुले, यज्ञा अभिजीत पाटील, आर्या अमित दुबे, तरुन्नम वसीम शेख, नंदिनी हरिश्चंद्र गोळे, तनिष्का प्रदीप आवटे पाटील, मेहेक विपुल लोढा, अनुष्का बापू शिंदे या खेळाडूंनी विजय खेचून आणला. आणि राज्याच्या बेसबॉल स्पर्धेमध्ये डॉ. कदम गुरुकुल इंदापूर चे नाव कोरले. तसेच 67th बेसबॉल नॅशनल स्पर्धेसाठी. यश सुरेश शिंदे, ओम बालाजी अडसुळे, अस्मि नितीन राऊत, यज्ञ अभिजीत पाटील, तनया सचिन पवार, आर्या विकास चव्हाण, वेदांत ज्ञानेश्वर देवकर, आर्या अमित दुबे या खेळाडूंची निवड झाली. या दोन्ही संघाचे प्रशिक्षक सोमनाथ नलवडे,सचिन सूर्यवंशी, शुभदा राऊत मॅडम यांचे डॉ. कदम गुरुकुल चे चेअरमन डॉ. एल. एस. कदम सर शैक्षणिक संचालिका डॉ. सविता कदम सचिव नंदकुमार यादव डॉ. कदम गुरुकुल च्या प्राचार्य वृंदा मुलतानी जोशी, उपप्राचार्य ऋषी बासू, अनिता पराडकर, स्कूल मॅनेजर संदीप जगताप सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विजयी खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे