बीटस्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नळवणेचे उत्तुंग यश
1 min read
नळवणे दि.१४:- पुणे जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती जुन्नर वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण कला – कीडा महोत्सव सन 2023 अंतर्गत बेल्हे बीटच्या बीटस्तरीय स्पर्धा जि.प. प्राथ शाळा गुंजाळवाडी (ता.जुन्नर) या ठिकाणी उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नळवणे (ता.जुन्नर) लहान गट (मुले) खो-खो प्रथम क्रमांक आला.
लोकनृत्य स्पर्धा मोठा गट प्रथम क्रमांक आला. त्याचप्रमाणे सूरज प्रकाश शेंगाळ (मोठा गट) याने लांब उडीत प्रथम क्रमांक पटकावला, सुरज प्रकाश शेंगाळ (मोठा गट) गोळा फेक द्वितीय क्रमांक आराध्या उत्तम शेवाळे, लांब उडी (लहान गट) द्वितीय क्रमांक आला.
विविध क्रीडा प्रकारात सर्व मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व यश संपादन केले. त्यांना शाळेचे, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले. शाळेच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती – नळवणे, ग्रामपंचायत नळवणे व सर्व ग्रामस्थांच्या वतीने शिक्षक व विद्यार्थी यांचे कौतूक करण्यात आले व तालुका स्पर्धेच्या यशासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.