भैरवनाथ क्रिकेट क्लब ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी!
1 min readम्हाळुंगे पडवळ दि ६:- म्हाळुंगे पडवळ (ता.आंबेगाव) येथील ठाकरवाडी आदिवासी युवकांचे वतीने आदिवासी बांधवांसाठी ठेवण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत चाळीस संघानी सहभाग घेतला.
ज्यात भैरवनाथ क्रिकेट क्लब म्हाळुंगे पडवळ ने किशोरभाऊ चासकर यांचे पंधरा हजार रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले, द्वितीय क्रमांक एम.एस.स्पोर्टस कडाळवाडी नारायणगाव, त्रुतिय जयभवानी ईलेव्हन सेलु ता खेड,
तर चतुर्थ क्रमांक दोस्ती ईलेव्हन सिन्नर यांचा आला. यावेळी प्रमुख पाहुणे मनोहर गोरगल्ले संपादक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर, प्रा.अनिल निघोट मा तालुका प्रमुख भारतीय विद्यार्थी सेना,
शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे, समाज सेवक किशोरभाऊ चासकर, राष्ट्रीय खेळाडू पोपट थोरात, ग्रा पं.सदस्य अंकुश जाधव यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
स्पर्धेसाठी भैरवनाथ क्रिकेट क्लब म्हाळुंगे पडवळचे कप्तान अक्षय काळे, पप्पु काळे, राहुल जाधव, राहुल काळे, पुंडलिक मराडे, अरविंद काळे, स्वप्निल मेंगाळ यांनी तर समालोचन व सुत्रसंचलन विजय जाधव गळुंचवाडी यांनी तर आभार अंकुश केदार यांनी मानले.